---Advertisement---

बर्थडे बॉय यशस्वी जयस्वालने केला मोठा कारनामा; टीम इंडियाचीही मालिकेत विजयी आघाडी

On: रविवार, डिसेंबर 29, 2019 3:21 PM
---Advertisement---

शनिवारी(28 डिसेंबर) यशस्वी जयस्वालच्या चार विकेट आणि 89 धावाच्या मदतीने भारतच्या 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण अफ्रिेकेच्या 19 वर्षांखालील संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात 8 राखून पराभूत केले आणि वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यात 18 वर्षाचा फिरकी गोलंदाज जयस्वालने चांगली गोलंगाजी करत 3.5 षटकात 13 धावा देऊन 4 खेळाडू बाद केले. तसेच आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर आणि रवि बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 29.5 षटकात 119 धावांवरच संपुष्टात आला. दक्षिण अफ्रिेकेकडून जोनाथन बर्डने सर्वाधिक 25 धावा केल्या.

त्यानंतर 120 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग 0 धावेवर बाद झाला. तसेच त्याच्या पाठोपाठ शाश्वत रावतही 2 धावा करुन बाद झाला. पण पुढे यशस्वी जयस्वालने ध्रुव जुरेलला साथीला घेत भारताच्या संघाची कमान सांभाळली.

यशस्वीने 56 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या आणि भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. ही खेळी यशस्वीसाठी खूप खास ठरली, कारण काल(28 डिंसेबर) त्याचा 18 वा वाढदिवस देखील होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---