---Advertisement---

अखेर यशस्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास झाला तयार, कर्णधार शार्दुलही परतला मुंबई संघात

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 5:10 PM
---Advertisement---

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात लीग स्टेजचे सामने संपले असून उपांत्यपूर्व फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईचा सामना कर्नाटकशी होणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी संघात दोन मोठे बदल झाले आहेत. यशस्वी जायसवाल आणि शार्दुल ठाकूर संघात परतले आहेत.

शार्दुल दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही. तसेच यशस्वी का संघाबाहेर होता हे कारण समोर आले नाही. तो भारताच्या टी२० संघाचा भाग नाही, यामुळे तो सध्यातरी राष्ट्रीय संघातून बाहेर असल्याने त्याने देशांतर्गत स्पर्धा खेळणे आवश्यक होते. तरीही त्याने मुंबईकडून मागील सामना खेळला नाही.

यशस्वीने सध्याच्या हंगामातील केवळ एकच सामना खेळला आहे. त्याने राजस्थानविरुद्धच्या त्या सामन्यात दोन्ही डावात मिळून २२३ धावा केल्या होत्या. त्यातील दुसऱ्या डावात त्याने १५६ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. मुंबईकडून मागचा सामना न खेळल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) त्याच्यावर नाराज होते असे वृत्त समोर आले होते. तसेच तो काही निवडक सामने खेळण्याचा निर्णय घेत होता, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

खरेतर यशस्वी सामन्यासाठी पूर्णपणे फिट नव्हता. एका सामन्यात अचानक त्याची प्रकृती खालावली, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. कर्नाटकविरुद्धचा सामना बाद फेरीचा असल्याने तो आता कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. तसेच मुंबईने ४२ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.

मुंबईचा मागील सामना दिल्लीसोबत होता जो अनिर्णीत राहिला. त्यांनी ७ पैकी ४ सामने जिंकत एलिट ग्रुप डी च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिले. तसेच कर्नाटकने पंजाबला ५ विकेट्सने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मुंबईचा रणजी ट्रॉफीसाठी संघ-

शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जायसवाल, मुशीर खान, सरफराज खान, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, साईराज पाटिल, शम्स मुलानी, तनुष कोटियान, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार तरमाळे, दिव्यांश सक्सेना आणि सूर्यांश शेडगे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---