राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना खेळला रंगला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थान संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी राजस्थानच्या युवा सलामीवाराने दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढत पहिल्याच षटकात चौकारांचा पाऊस पाडला आणि खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, तो अशी कामगिरी करणारा 15वा खेळाडू ठरला.
झाले असे की, शनिवारी (दि. 8 एप्रिल) राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघातील नाणेफेक दिल्लीने जिंकली होती. तसेच, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि जोस बटलर (Jos Buttler) क्रीझवर उतरले होते. यावेळी दिल्लीकडून खलील अहमद (Khaleel Ahmed) पहिले षटक टाकत होता.
यशस्वी जयसवालचा विक्रम
खलीलने चेंडू टाकण्यास सुरुवात करताच जयसवालनेही जोरदार फटके मारण्यास सुरुवात केली. खलीलच्या पहिल्या तिन्ही चेंडूवर जयसवालने 3 चौकार मारले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव सुटला. पुढे पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा चौकारांची बरसात केली. चौकारांची बरसात केल्यानंतर जयसवालच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो आयपीएलमध्ये एका षटकात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा 15वा खेळाडू ठरला.
4️⃣4️⃣4️⃣.4️⃣4️⃣
Starting off in style, the @ybj_19 way 💥@rajasthanroyals openers are up and running!
Follow the match ▶️ https://t.co/FLjLINwRJC#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/ycWiNSKg5M
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
विशेष म्हणजे, आयपीएलच्या एका षटकात सहा चौकार मारण्याचा विक्रम अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांच्या नावावर आहे. तसेच, त्यांच्याव्यतिरिक्त इतर 13 खेळाडूंनी एका षटकात 5 चौकार मारले आहेत. त्या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल (दोनदा), शेन वॉटसन (दोनदा), ऍडम गिलख्रिस्ट, माहेला जयवर्धने, एडेन ब्लिझर्ड, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, डेविड वॉर्नर, नितीश राणा, मोईन अली आणि आता यशस्वी जयसवाल यांचा समावेश आहे.
5️⃣0️⃣ & going strong 💪🏻💪🏻@ybj_19 is looking unstoppable at the moment here in Guwahati 👌👌
What do you think will be his final score 🤔
Follow the match ▶️ https://t.co/FLjLINwRJC#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/cHWnlzCAXG
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
जयसवालचे अर्धशतक
यशस्वी जयसवाल याने या सामन्यात अर्धशतकही झळकावले. त्याने 25 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. हे त्याचे आयपीएल कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक होते. यावेळी 7 षटकांच्या खेळानंतर राजस्थानने एकही विकेट न गमावता 79 धावा केल्या होत्या. (Yashasvi Jaiswal Record against delhi capitals in 11th match know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ
मोठी बातमी! मुंबई विरुद्ध चेन्नई सामना होणार रद्द?