भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर मालिकेत दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीवर आले आहेत. भारतासाठी डावाची सुरुवात शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 165 धावांची भागीदारी झाली. हे भारतीय सलामीवीर जोडीचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 17 षटकांमध्ये आणि अवघी एक विकेट गमावून गाठले. यशस्वी जयसवाल याने 51 चेंडूत 84* धावा केल्या. तर शुबमन गिल 47 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 165 धावांची खेळी ठरली. ही भारतीय सलामीवीर जोडीकडून केली गेलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी 2017 मध्ये सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 165 धावांची भागीदारी केली होती.
एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाच्या इतिहासात ही टी-20 क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम प्रदर्शन आहे. दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन यांनी 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळताना इतिहास रचला होता. या दोघांनी आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. ही टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी राहिली आहे. यादीत दुसरा क्रमांक केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचे आहे. या दोघांनी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 165 धावांची भागीदारी केली होती. यादीत तिसरा क्रमांक यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल यांचा येतो. या दोघांनी शनिवारी (12 जुलै) वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 165 धावा कुटल्या. चौथ्या क्रमांकावर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांचे नाव आहे. या दोघांनी 2016-8 मध्ये आयर्लंडविरुद्ध 160 धावांची भागीदारी केली होती.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन देखील कौतुकास पात्र राहिले. अर्शदीप सिंग याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव यायने 2, तर युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. सामना संपल्यानंतर नाबाद 84 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जयसवाल याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. (Yashasvi Jaiswal & Shubman Gill One of the finest opening partnerships!)
महत्वाच्या बातम्या –
शफाली वर्मासह विमानतळावर गैरवर्तन! ट्विटरवर सांगितली आपबिती, वाचा संपूर्ण प्रकरण
यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच