भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर मालिकेत दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीवर आले आहेत. भारतासाठी डावाची सुरुवात शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 165 धावांची भागीदारी झाली. जयस्वालने 84 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर बोलताना त्याने भारतीय संघाच्या अनुभवी खेळाडूंचे कौतुक केले.
नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 17 षटकांमध्ये आणि अवघी एक विकेट गमावून गाठले. यशस्वी जयसवाल याने 51 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. तर शुबमन गिल 47 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. जयस्वालने 11 चौकार व 3 षटकारांनी आपली खेळी सजवली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना तो म्हणाला,
“आमच्या संघात अनेक दिग्गज व अनुभवी खेळाडू आहेत. रोहित भैया, विराट भैय्या, सूर्या भाई आणि हार्दिक भैय्या यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्यांचा अप्रोच आणि मानसिक स्थिती काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न असतो. त्यांचा अनुभव नक्कीच कामी येतो.”
जयस्वाल याने यावर्षी देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. याच दौऱ्यावर त्याने कसोटी पदार्पण करताना दीड शतक साजरे केलेले. आपल्या पहिल्या टी20 सामन्यात तो केवळ एक धाव करू शकलेला. मात्र, ते अपयश भरून काढत त्याने दुसऱ्या सामन्यात थेट सामनावीर पुरस्कार जिंकला.
(Yashasvi Jaiswal Talk About Team India Seniors After Florida T20I Against T20I)
महत्वाच्या बातम्या –
शफाली वर्मासह विमानतळावर गैरवर्तन! ट्विटरवर सांगितली आपबिती, वाचा संपूर्ण प्रकरण
यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच