बुधवारी (२९ सप्टेंबर) राजस्थान राॅयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थानला ७ विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात राजस्थानचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. एकंदरीत पाहिले तर त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु तो पुढे मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने या संपूर्ण हंगामात संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, पण त्याला अपेक्षेप्रमाणे मोठी खेळी करता आलेली नाही. आरसीबीविरुद्ध सामना संपल्यानंतर त्याने याविषयी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केली आहे.
राजस्थान राॅयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जयस्वाल यासंबंधी बोलत आहे. तो म्हणाला की, “मला माहित करून घ्यायचं होतं की, मोठी धावसंख्या कशी करतात. मी विराट भैयासोबत याविषयीच बोललो की, मी प्रभाव कसा सोडू आणि माझ्या संघाला मदत कशी करू शकतो. त्यांनी खूप चांगल्याप्रकारे समजवले की, मी कसे चांगले प्रदर्शन करू शकतो आणि माझ्या खेळात सुधार करू शकतो. त्यांनी मला सांगितली की, ते असे प्रत्येक वेळी सकारात्मक राहीले.”
यशस्वीने आयपीलच्या दुसऱ्या टप्प्यात सतत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, पण तो मोठी खेळी करू शकलेला नाही. त्याने दुसऱ्या टप्प्यात ३१, ३६ आणि ४९ अशा धावा केल्या आहेत. तो व्हिडिओत पुढे म्हणत आहे की, “मला तसे करता येत नाहीये, जसे मला करायचे आहे. हे चांगले आहे की, मी चांगली सुरुवात करत आहे. पण मला पुन्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी याला मोठ्या धावसंखेत बदलू इच्छित आहे. मला हे जाणून घ्यावे लागेल की मोठी धावसंख्या कशी केली जाते.”
आयपीएल २०२० मध्ये जयस्वालला त्याच्या प्रदर्शनामुळे सतत संघातून आता बाहेर ठेवले गेले. तसेच आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातही त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जोस बटलरसारख्या खेळाडूच्या गैरहजेरीत त्याला संधी मिळाली आहे. तसेच जयस्वाल त्याला दिल्या गेलेल्या संधीला पात्रही ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलचा नवा विक्रम! पंजाबसाठी ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज
जागा एक दावेदार चार! आता रंगणार प्ले ऑफसाठी खरा महासंग्राम; जाणून घ्या सर्व गणिते
अशक्य ते शक्य करून दाखवतो, तो आहे धोनी…! कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्टंपिंग, पाहा एकाच व्हिडिओत