---Advertisement---

यशस्वी जयस्वालला द्विशतकांमुळे कसोटी क्रमवारीत झाला बंपर फायदा, केला आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड

---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने आपल्या नावानुसार पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. यशस्वीने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये गरुड झेप घेतली आहे. आयसीसीने बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी क्रमवारी जाहीर केली. यशस्वीला या रँकिंगमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे.

याबरोबरच, यशस्वी जयस्वाल याने कसोटी क्रमवारीत थेट 14 स्थानांची मोठी झेप घेत 29 वरुन थेट 15 व्या स्थानी येऊन पोहचला आहे. तसेच  यशस्वी जयस्वाल याच्या नावावर 699 रेटिंग्स आहेत. तर टॉप 15 मध्ये यशस्वी व्यतिरिक्त टीम इंडियाच्या 3 फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली 7 वं स्थान, रोहित शर्मा 12 वं स्थान आणि ऋषभ पंत 14 व्या स्थानी आहे.

तसेच यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विशाखापट्टणम आणि त्यानंतर राजकोटमध्ये सलग द्विशतकी खेळी केल्या आहेत. यामध्ये विशाखापट्टणम येथे 209 धावांची खेळी केली, तर  राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये 214 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. याबरोबरच, यशस्वीने या खेळीत  12 सिक्स ठोकले होते. यासह कसोटीतील एका डावात सर्वाधिक 12 सिक्सच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तसेच यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने या मालिकेत सर्वाधिक दोन द्विशतकेही झळकावली आहेत. तसेच यशस्वी जैस्वालने आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन जबरदस्त फॉर्मात असून रँकिंगमध्ये टॉपवर  आहे. हॅमिल्टनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने विजयी शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानंतर त्याने 133 धावांची नाबाद खेळी केली. केन विल्यमसनच्या या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी इतिहासातील पहिली मालिका जिंकली होती.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---