क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम बनतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्येही हे दिसून आलं आहे. असाच एक विक्रम हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. या सामन्यात एका फलंदाजानं चक्क 400 हून अधिक धावा ठोकल्या आहेत.
हरियाणाचा दमदार खेळाडू यशवर्धन दलालनं हा पराक्रम केला. त्यानं 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीच्या सामन्यात चक्क 400 हून अधिक धावा केल्या! आपल्या या खेळीत त्यानं तब्बल 46 चौकार आणि 12 षटकार मारले! या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हरियाणानं 8 विकेट गमावून 732 धावा केल्या होत्या. यशवर्धन सलामीला आला होता. दुसऱ्या दिवसापर्यंत त्यानं 463 चेंडूंचा सामना करत नाबाद 426 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 92.01 एवढा होता.
हरियाणासाठी यशवर्धनसोबत अर्श सलामीला आला होता. त्यानं देखील या सामन्यात शतक झळकावलं. अर्शनं 311 चेंडूंचा सामना करत 151 धावा केल्या. अर्शच्या या खेळीत 18 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी 410 धावांची भागीदारी झाली. अर्शनं या भागीदारीत 151 धावांचं, तर यशवर्धननं 243 धावांचं योगदान दिलं.
हरियाणाच्या या दमदार कामगिरीमुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघानं 8 गडी गमावून 732 धावा केल्या होत्या. कर्णधार सर्वेश रोहिल्लानं 59 चेंडूंचा सामना करत 48 धावा केल्या. पर्थ वत्स 24 धावा करून बाद झाला. पर्थ नागिलनं 5 धावा केल्या. मुंबईकडून अथर्व भोसलेनं 5 विकेट घेतल्या. मात्र त्यानं आपल्या 58 षटकात 135 धावा दिल्या.
हेही वाचा –
आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब, लवकरच दाखवला जाईल बाहेरचा रस्ता
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल
Prithvi Shaw Birthday : एकेकाळी सचिन तेंडुलकरशी तुलना व्हायची, आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळेना!