गुरूवार (२८ जुलै) बर्मिंघम, इंग्लंड येथे कॉमनवेल्थ गेम्सला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचताच सरावाला सुरूवात देखील केली आहे. या स्पर्धेसाठी संघाने कसून तयारी केली असून आम्ही पूर्णपणे तयार आहोत. त्यातच भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणे हेच उद्दीष्ट आहे, असे विधान संघाची यष्टीरक्षक-फलंदाज यस्तिका भाटियाने केले आहे.
या स्पर्धेत भारत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर स्म्रिती मंधाना संघाची उपकर्णधार आहे. माजी कर्णधार मिताली राज हिच्याकडून भारतीय संघाच्या पदार्पणाची कॅप घेणाऱ्या यस्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिने बीसीसीआयने टाकलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, “आम्ही सगळे या स्पर्धेसाठी तयार आहोत. तसेच आम्ही त्याची कसून तयारी केली असून सुवर्ण पदक जिंकणे हेच आमचे लक्ष्य आहे.”
यस्तिकाने भारताकडून एक कसोटी, १६ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. या स्पर्धेत यस्तिकाबरोबरच तानिया भाटियाचा पण समावेश आहे. तर यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती यस्तिका असणार आहे.
भारतीय महिला संघ (Indian Women Cricket Team) त्यांच्या कॉमनवेल्थ गेम्स अभिनायाची सुरुवात २९ जुलैपासून करेल. भारतीय संघ कॉमनवेल्थ गेम्समधील अ गटाचा भाग आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस या संघाचा समावेश आहे. बार्बाडोस हा मुळात वेस्ट इंडिजचाच संघ आहे. परंतु तो बार्बाडोस नावाने स्पर्धेत सहभागी होणार आहे.
💬 💬 The Indian team is eyeing a Gold Medal at the Commonwealth Games: @YastikaBhatia #B2022 | #TeamIndia pic.twitter.com/PBxm5TX4U1
— BCCI Women (@BCCIWomen) July 28, 2022
ऑस्ट्रेलियानंतर चाहत्यांसाठी पर्वणी ठरणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ३१ जुलैला खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामने टी२० प्रकारचे होणार असून सर्व सामने एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर खेळले जाणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी
जखम दिलेली भारताने आता इंग्लंडने आफ्रिकेविरुद्ध चोळलाय मलम! पहिल्या टी२०त मिळवला तुफानी विजय