आयसीसी महिला विश्वचषक २०२२च्या १०व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. या सामन्यात स्म्रीती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने शतक लगावले होते. सामनावीर म्हणून स्म्रीतीला गौरवण्यात आले. परंतु तिने अपील केले आहे की, या ट्राॅफीची हक्कदार हरमनप्रीत सुद्धा आहे. तिने ट्राॅफी शेअर करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात मंधानाने ११९ चेंडूत १३ धावा केल्या आणि हरमनप्रीतने १०७ चेंडूत १०९ धावा केल्या. त्या दोघींनी ही शानदार कामगिरी केल्यामुळे सामनावीर निवडणे कठीण काम होते, परंतु २२व्या सामन्यात सुद्धा हा प्रकार पुन्हा पाहायला मिळाला आहे.
आयसीसी महिला विश्वचषकाच्या (ICC Womens World Cup 2022) २२व्या सामन्यात भारत आणि बांग्लादेश या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात ८० चेंडूत ५० धावा करणाऱ्या यास्तिका भाटियाला (Yastika Bhatia) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तर याच सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करताना ३० धावा देत ४ विकेट्स घेणारी आणि फलंदाजी करताना २ चौकारांच्या मदतीने २७ धावा करणाऱ्या स्नेह राणाला दुर्लक्षित केले गेले. यास्तिका भाटियाचा स्ट्राईक रेट ६२.५० होता, तर स्नेह राणाचा (Sneh Rana) स्ट्राईक रेट ११७ हून अधिक होता.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील २२वा सामना भारताने ११० धावांनी जिंकला. राणाने बांग्लादेशची कर्णधाराची सुद्धा विकेट घेतली आहे. तसेच, तिने या सामन्यात २ अप्रतिम झेल सुद्धा घेतले. एकीकडे यास्तिकाने ८० चेंडूत ५० धावा करत एक झेल घेतला आणि दुसरीकडे स्नेह राणाने २३ चेंडूत २७ धावा केल्या आणि ४ विकेट्ससोबतच दोन झेल देखील घेतले. या दोघींमध्ये राणाची खेळी चांगली असल्याने तिला सामनावीर म्हणून गौरवले पाहिजे होते. यास्तिकाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
भारतीय संघाने महिला विश्वचषकात चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग १८ पराभवांनंतर पाकिस्तानने चाखला विजयाचा स्वाद, कर्णधाराने मुलीसोबत साजरा केला आनंद
मुंबईकरांचा नेट्समध्येही क्लास खेळ, पोलार्ड आणि ‘बेबी एबी’चा बुमराहच्या यॉर्करवर कसून सराव
क्रिकेटसाठी काय पण! कुटूंबीय आजारी असूनही शाकिब अल हसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरणार मैदानात