भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेट समाविष्ट करण्यात आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दुसरीकडे भारतीय महिला संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कॉमनवेल्थमधील हा अंतिम सामना एकदम चुरसीत सुरू होता. त्यामुळे प्रत्येकजण तणावात दिसत होता. मात्र, सामन्याच्या गंभीर क्षणी अशी एक घटना घडली ज्याच्यामुळे फक्त भारतीय खेळाडू नाही तर सामना पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हशा पिकली.
त्याचं झालं असं, भारतीय संघात सामन्याच्या सुरुवातीला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तानिया भाटीया हिचा समावेश केला गेला होता. मात्र,ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत असताना एक बॉल थेट तानियाच्या डोक्याला लागला. काही वेळ वैद्यकिय चाचणी केल्यानंतर सामना पुर्ववत सूरु झाला. मात्र, पहिला डाव संपल्यानंतर भारतीय चाहत्यांसाठी एक वाऊट बातमी समोर आली. तानिया भाटीया वैद्यकीय कारणांमुळे या सामन्यात फलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून यास्तिका भाटीया हिला फलंदाजीची संधी मिळाली.
https://twitter.com/kookaburra_bat/status/1556470363659603968
मात्र, यास्तिका फलंदाजीसाठी मदानात उतरत असतानाच मैदानाबाहेरील जाहिरातीच्या बोर्डात पाय अडकत यास्तिका मैदानावर पडली. ही घटना पाहून तिच्या मागे बसलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर भारतीय खेळाडूंना हसू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनीतर या घटनेला भारतीय संस्कृतीनुसार अशुभ घटनेचा संकेत असल्याचे सांगत याच गोष्टीमुळे सामना हरल्याचे भाकित वर्तवलं आहे. मात्र, अनेकांनी या घटनेचा केवळ आनंद घेत भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना १६१ धावा रचल्या. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाज बेथ मूनीने संघासाठी सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर दुसरीकडे १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक ६५ धावा केल्या. मात्र, शेवटी भारतीय संघाला या सामन्यात १० बाद केवळ १५२ धावा करता आल्या आणि सामन्यात ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG CRICKET: हरमन-जेमिमाची झुंज अपयशी; अखेर क्षणी बाजी पलटवत ऑस्ट्रेलियाचा सुवर्णपदकावर कब्जा