वर्ष २०२१ चा आज अखेरचा दिवस आहे. २०२१ वर्षात सुद्धा चांगल्या-वाईट दोन्ही घटना घडल्या. यावर्षात सुद्धा कोरोनाने त्याच वर्चस्व कायम ठेवलं. याचा परिणाम क्रिकेटवरसुद्धा झाला. काही दौरे रद्द झाले, तर खेळाडूंना कडक नियम पाळत जैव सुरक्षित वातावरणात रहावं लागलं. तरी काही फलंदाजांनी सतत जैव सुरक्षित वातावरणात राहून चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी त्याचा परिणाम फलंदाजीवर नाही पडू दिला.
क्रिकेटमध्ये कसोटी खेळणं म्हणजे खेळाडूंसमोर एक आव्हान असतं. गोलंदाज आणि फलंदाजांची खरी परीक्षा कसोटीमध्ये असते. २०२१ मध्ये सुद्धा कसोटीमध्ये काही फलंदाजांनी धावांचा रतीब घातला. या तर जाणून घेऊया असे ५ खेळाडू ज्यांनी २०२१ मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
जो रूट (Joe Root)
जो रूटसाठी २०२१ हे वर्ष अविस्मरणीय होते. इंग्लंडच्या या कर्णधाराने १५ सामन्यात खेळलेल्या २९ डावांत ६१.०० च्या सरासरीने १७०८ धावांचा डोंगर केला आहे. यात त्याने ६ शतके तसेच ३ अर्धशतके सुद्धा झळकावली. त्याचा २०२१ मधला सर्वाधिक स्कोर २२८ धावा हा आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ११ कसोटी सामने खेळले ज्यात खेळलेल्या २१ डावांत ४७.६८ च्या सरासरीने ९०६ धावा केल्या. यात त्याने २ शतकं, तसेच ४ अर्धशतकं ठोकली. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रोहित सोबत राहुलने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. दोघांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याचा २०२१ मधला सर्वाधिक स्कोर १६१ धावा आहे.
दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्ने आहे. त्याने ७ सामन्यात खेळलेल्या १३ डावांत ६९.३८ च्या सरासरीने ९०२ धावा केल्या. त्याने ४ शतकं आणि ३ अर्धशतकं केली. त्याचा २०२१ मधला सर्वाधिक स्कोर २४४ धावा आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant)
यादीत चौथा क्रमांक भारताच्या धडाडीच्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने पटकावला आहे. त्याने १२ सामन्यात खेळलेल्या २१ डावांत ३९.३६ च्या सरासरीने ७४८ धावा केल्या. त्याने एक शतक आणि ५ अर्धशतकं देखील केली. त्याची भारताच्या ऐतिहासिक विजयात गाबा विजयात ८९* ही महत्त्वपूर्ण खेळी होती. त्याचा २०२१ मधला सर्वाधिक स्कोर १०१ धावा हा होता.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
या यादीत पाचव्या क्रमांकावर भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आहे. त्याने यावर्षी १४ कसोटी सामन्यांत खेळलेल्या २६ डावांत २८.०८ च्या सरासरीने ७०२ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. यावर्षी ९१ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली. ही खेळी त्याने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी केली होती.
आबिद अली(Abid Ali)
या यादीत पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा ३४ वर्षीय सलामीवीर फलंदाज आबिद अली आहे. त्याने ९ सामन्यात खेळलेल्या १५ डावांत ४९.६४ च्या सरासरीने ६९५ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतके, तसेच अर्धशतके सुद्धा केली. त्याचा २०२१मध्ये सर्वाधिक स्कोर २१५ धावा होता. त्याने पाकिस्तानला नेहमी चांगली सुरुवात करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव
इंग्लंडच्या ३९ वर्षीय खेळाडूची कमाल ! सूपरमॅन स्टाईलमध्ये केला झेलाचा ‘अविश्वसनीय’ प्रयत्न
इंग्लंडचे सलामीवीर २०२१ वर्षात सुपरफ्लॉप! नको असलेल्या विक्रमाच्या यादीत गाठले अव्वल स्थान
व्हिडिओ पाहा –