मागील काही महिन्यांपासून भारताच्या क्रिकेट वर्तुळात यो-यो टेस्टचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला आहे. अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते ही एक चांगली गोष्ट आहे तर अनेकांनी या यो-यो टेस्टवर नाराजी व्यक्त केली आहे.
आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही यो-यो टेस्टविषयी आपली मते मांडली आहेत. तो म्हणाला, ” मला वाटते की काही क्षेत्ररक्षणाचे स्तर हे महत्त्वाचे आहेत. मी कधीही यो-यो टेस्ट दिली नाही पण आम्ही बीप टेस्ट दिली आहे. जी साधारण यो-यो टेस्ट सारखीच आहे.”
“पण यो-यो टेस्ट हा एकच निकष असू शकत नाही. यात फिटनेस आणि खेळाडूंची क्षमता यांचे मिश्रण हवे. माझ्या मते यो-यो टेस्ट महत्त्वाची आहे पण त्याचबरोबर खेळाडूंची क्षमता आणि खेळाडू किती फिट किंवा अनफिट आहे हे पहाणेही महत्त्वाचे आहे.”
सध्या भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी यो-यो टेस्ट यशस्वी पार करणे बीसीसीआयने सक्तीचे केले आहे. काही दिवसांपूर्वी यो-यो टेस्ट अपयशी झाल्याने मोहम्मद शमी आणि आंबाती रायडूला भारताच्या संघातील स्थान गमवावे लागले होते. तर संजू सॅमसने भारत अ संघातून स्थान गमावले होते.
शमीने ही यो-यो टेस्ट पून्हा देत ती यशस्वीरित्या पार केल्याने त्याला 1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–या गोष्टीमुळे राहुल द्रविड झाला आनंदीत
–मुथय्या मुरलीधरनने आजच्याच दिवशी २०१० साली, क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
–आयसीसी कसोटी क्रमवारी: टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम राहणार