पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 8 वे पदक मिळाले आहे. योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. योगेश कथुनियाचा पहिला थ्रो 42.22 मीटर होता. यानंतर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अनुक्रमे 41.50 मीटर, 41.55 मीटर, 40.33 मीटर आणि 40.89 मीटर होता.
पदकतालिकेत भारत सध्या 30व्या स्थानावर आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत. योगेश कथुनियानं यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. अशा प्रकारे त्याने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून मोठे यश मिळवले आहे. आता भारताच्या पदकांची संख्या 8 वर पोहोचली आहे.
भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) मध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर मोना अग्रवालने या स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांच्यानंतर प्रीती पालने भारताला तिसरे पदक मिळवून दिले. तिने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत (T35) पदक जिंकले. मनीष नरवालने भारताला चौथे पदक मिळवून दिले. मनीष त्याने 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) मध्ये रौप्य पदक जिंकले. रुबानी फ्रान्सिसने पाचवे पदक, प्रीती पालने सहावे पदक, निषाद कुमारने सातवे आणि योगेश कथुनियाने आठवे पदक जिंकले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय
अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक
मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्यपदक
प्रीति पाल (अॅथलेटिक्स) – 2 कांस्यपदक
मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्यपदक
रुबीना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्यपदक
निशाद कुमार (अॅथलेटिक्स) – रौप्यपदक
योगेश कथुनिया (अॅथलेटिक्स) – रौप्यपदक
हेही वाचा –
युवराज सिंगला ‘भारतरत्न’ मिळावा, वडील योगराज सिंग यांची मागणी
अंडर 19 संघात निवड होण्यापूर्वी समितला वडील राहुल द्रविडकडून काय सल्ला मिळाला? प्रशिक्षकांचा खुलासा
प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलं आणखी एक मेडल