माजी भारतीय क्रिकेटर आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंगह धोनीविरोधात अनेक वक्तव्य केले आहेत. मी महेंद्रसिंगह धोनीचा आदर करतो, पण एक व्यक्ती म्हणून त्यानं माझा मुलगा युवराजशी जे केले ते मी कधीही माफ करू शकणार नाही, असं ते म्हणाले. याशिवाय योगराज सिंह यांनी युवराज सिंहला भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणीही केली आहे. युवराज सिंगची कारकीर्द 4 वर्षांपूर्वी संपलं असून याला महेंद्रसिंग धोनी जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग एका यूट्यूब चॅनलवर आपले मत व्यक्त करत होते. योगराज सिंगने महेंद्रसिंग धोनीवर युवराज सिंगसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला. माजी कर्णधाराला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला पाहिजे, धोनीने युवराजला जाणूनबुजून संधी दिली नाही, त्यामुळे त्याची कारकीर्द अकालीच संपुष्टात आली, असे ते म्हणाले.
योगराज सिंग यांनी धोनीवर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी अनेकवेळा मीडियासमोर धोनीवर युवराज सिंगची कारकीर्द संपवल्याचा आरोप केला आहे. योगराज सिंह पुढे म्हणतात की, मी एमएस धोनीला कधीही माफ करणार नाही. त्यानं स्वतःला आरशात पहावे. तो महान क्रिकेटपटू आहे आणि मी त्याला सलाम करतो, पण त्याने माझ्या मुलाशी जे केले, ते अक्षम्य आहे.
योगराज पुढे म्हणाले, आता सर्वकाही बाहेर येत आहे आणि ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही. मी सर्वांना आव्हान देतो की युवराजसारखा मुलगा घडवा. विशेष म्हणजे, यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनीही युवराज सिंगला भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा –
अंडर 19 संघात निवड होण्यापूर्वी समितला वडील राहुल द्रविडकडून काय सल्ला मिळाला? प्रशिक्षकांचा खुलासा
बाबर आझमचा फ्लॉप शो सुरूच; शेवटचं अर्धशतक झळकावून 616 दिवस उलटली
लॉर्ड्स मैदानावर शतक आणि 5 बळी घेणारे 3 खेळाडू, मानाच्या यादीत एका भारतीयाचाही समावेश