पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत ओंकार अग्निहोत्री, आर्यन हूड, अथर्व अमरुळे, सोहम भरमगोंडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात ओंकार अग्निहोत्री याने सिद्धार्थ मराठेवर टायब्रेकमध्ये ९-८(५)असा विजय मिळवला. पार्थ बनसोडे व अथर्व अमरुळे यांनी अनुक्रमे अनमोल नागपुरे व आर्यन कोटस्थाने यांचा ९-५ अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली.
सोहम भरमगोंडे याने सफी कलादगीवर ९-४असा विजय मिळवला. अथर्व अमरुळे याने आर्यन कोटस्थानेला ९-५असे नमविले. आर्यन हूडने सोहम अमुंदकरचे आव्हान ९-४ असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी पात्रता फेरी: १६ वर्षाखालील मुले:
ओंकार अग्निहोत्री वि.वि.सिद्धार्थ मराठे ९-८(५);
पार्थ बनसोडे वि.वि.अनमोल नागपुरे ९-५;
अथर्व अमरुळे वि.वि.आर्यन कोटस्थाने ९-५;
आर्यन हूड वि.वि.सोहम अमुंदकर ९-४;
अर्जुन कांडत वि.वि.आर्यन पंथ ९-४;
परितोष पवार वि.वि.आदित्य राय ९-६;
ओंकार सुमार वि.वि.दिनेश पाटील ९-१;
सोहम भरमगोंडे वि.वि.सफी कलादगी ९-४.