पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत 14वर्षाखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडे, आस्मि आडकर, अपर्णा पतैत यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत 14वर्षाखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडेने मृण्मयी जोशीचा 9-4असा तर, आस्मि आडकरने उर्वी काटेचा 9-1असा सहज पराभव केला. अपर्णा पतैत हिने गार्गी शहावर टायब्रेकमध्ये 9-8(8-6)असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14वर्षाखालील मुली:
दुसरी पात्रता फेरी:
सानिका भोगाडे वि.वि.मृण्मयी जोशी 9-4;
आस्मि आडकर वि.वि.उर्वी काटे 9-1;
माही शिंदे वि.वि.अवनी चितळे 9-5;
अपर्णा पतैत वि.वि.गार्गी शहा 9-8(8-6);
तिस्या रावत वि.वि.कश्वी राज 9-4;
संज्योत मुदशिंगीकर वि.वि.कश्यपी महाजन 9-7;
12वर्षाखालील मुली: पहिली पात्रता फेरी:
अनन्या सिरसाठ वि.वि.सानिका लुकतुके 9-4;
ऐश्वर्या जाधव वि.वि.आर्या शिंदे 9-0;
आर्या बोरकर वि.वि.रिशिता लोटलीकर 9-2;
सिमरन थेत्री वि.वि.मिलोनी कदम 9-1;
सिया प्रसादे वि.वि.आदिती गुदलूलकर 9-4