पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पतंगे, दक्ष अगरवाल, ध्रुव सुरेश, अर्जुन चॅटर्जी यांनी तर, मुलींच्या गटात मधुरिमा सावंत, स्वरदा परब, शरण्या गवारे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अर्णव पतंगे याने कुणाल पवारचा 6-1, 6-1असा तर, दक्ष अगरवालने पार्थ भोईटेचा 6-1, 6-2असा पराभव केला. वेदांत मिस्त्रीने आयु शिंदळेकरवर टायब्रेकमध्ये 7-6(10), 6-2असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात गार्गी पवारने व्योमा भास्करला 6-1, 6-0असे नमविले. शरण्या गवारे हिने जिया परेराचा 6-1, 6-0असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 16 वर्षाखालील मुले:
अर्णव पतंगे वि.वि.कुणाल पवार 6-1, 6-1;
दक्ष अगरवाल वि.वि.पार्थ भोईटे 6-1, 6-2;
रोनिन लोटलीकर वि.वि.मोहम्मद कैफ 6-1, 6-2;
ध्रुव सुरेश वि.वि.अरमान अहमद 6-0, 6-3;
फरहान पत्रावाला वि.वि.प्रणव हेगरे 6-3, 6-1;
अर्जुन चॅटर्जी वि.वि.क्रिस नासा 6-3, 6-1;
कपिल कडवेकर वि.वि.आनंद मराठे 6-3, 6-3;
वेदांत मिस्त्री वि.वि.आयु शिंदळेकर 7-6(10), 6-2;
मुली: गार्गी पवार वि.वि.व्योमा भास्कर 6-1, 6-0;
शरण्या गवारे वि.वि.जिया परेरा 6-1, 6-0;
विपाशा मेहरा वि.वि.लक्षण्या विश्वनाथ 6-0, 6-4;
आर्णी रेड्डी वि.वि.सायना देशपांडे 6-4, 7-5;
रेश्मा मारुरी वि.वि.हर्षाली मांडवकर 6-4, 2-6, 6-2;
कोटिस्था मोडक वि.वि.मैथिली मोटे 6-2 6-4;
मधुरीमा सावंत वि.वि.रिया भोसले 7-6(7), 6-3;
स्वरदा परब वि.वि.सुहिता मारुरी 6-3, 6-3.–