कोलंबो| श्रीलंका संघाचे प्रशिक्षक निक पोथास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते दक्षिॆण आफ्रिकेचे माजी विकेटकीपर राहिले आहेत.
2016 पासुन श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आहे. तसेच त्यांचे गुरू ग्रॅहम फोर्ड यांच्या अचानक पायउतार होण्यामुळे पोथास लगेच सहा महिन्यानंतर या मुख्य प्रशिक्षक बनले होते.
पोथास यांचा श्रीलंका क्रिकेट बोर्डसोबत दोन वर्षाचा करार आहे. हा करार येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे पण त्यांनी तो एप्रिलमध्येच संपवला.
” हे दोन अविश्वसनीय वर्ष श्रीलंका क्रिकेटसोबत घालवल्यावर दुसरी संधी शोधण्याची हीच योग्य वेळ आहे आणि कुटूंबासोबत वेळ घालवण्याचीही गरज आहे. “, असे पोथास यावेळी म्हणाले.
44 वर्षीय साऊथम्पटनवासी पोथास यांना युनायटेड किंगडममध्ये प्रशिक्षणाच्या नव्या संधी शोधायच्या आहेत. कुटूंबाच्या काही कारणांमुळे त्यांना मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका संघाच्या लाहोर भेटी दरम्यान संघासोबत जाता आले नाही.
भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेच्या वेळी ते प्रशिक्षक होते पण यामध्ये श्रीलंकेचा जोरदार पराभव झाला होता. तसेच त्याआधी झिम्बाब्वे विरूध्दच्या पाच एकदिवसीय मालिकेसाठीही ते प्रशिक्षक होते. त्यावेळीही श्रीलंका संघाला पराभूत व्हावे लागले.
विशेष म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये युएईत श्रीलंकेने पाकिस्तानला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केले होते. युएई हे 2010 पासून पाकिस्तानचे घरचे मैदान आहे. या मैदानावर पाकिस्तानने एकही कसोटी सामना गमावला नव्हता.
” मी श्रीलंका क्रिकेटचा, खेळांडूचा आभारी आहे. या कालावधीमध्ये ज्यांनी मला मदत केली त्यांचासुध्दा मी आभारी आहे.”
“श्रीलंका क्रिकेटचा भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला प्रशिक्षक म्हणून सुधारण्याची आणि शिकवण्याची तसेच उत्तम खेळाडू घडवण्याची संधी दिली. यासाठी श्रीलंका क्रिकेटचे नेहमीच माझ्या हृद्यात महत्वाचे स्थान असेल “, असेही ते म्हणाले.
श्रीलंका क्रिकेटने सध्या कोणत्याच खेळाडूचे नाव क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून घोषात केले नाही. तर त्यांनी प्रशिक्षक विभागातलेच उपुल चंदना आणि मनोज अबेविक्रमा यांनाच क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून तात्पूरती जबाबदारी दिली आहे.
Nic Pothas, National Fielding Coach of Sri Lanka Cricket has resigned from his post with effect from 13th April 2018.
— Roshan Abeysinghe (@RoshanCricket) April 17, 2018