बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील रविवारचा दिवस भारतीय संघासाठी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा राहिला. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत विजय मिळवत सुवर्णपदकासाठी दावेदारी ठोकली. तर, अनुभवी किदंबी श्रीकांत याला अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. महिलांमध्ये दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकलेली पीव्ही सिंधू ही पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचली आहे.
पुरुषांच्या पहिल्या उपांत्य फेरी लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग टे याचा पराभव केला. लक्ष्य पहिल्या गेममध्ये पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन करत सलग दोन गेम आपल्या नावे करत सामना १०-२१, २१-१८, २१-१६ असा खिशात घातला. २० वर्षीय लक्ष्य प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत उतरला होता. आता सोमवारी (८ ऑगस्ट) तो अंतिम सामन्यात उतरेल.
Lakshya Sen beat Singapore's Jia Heng Teh 21-10, 18-21,
21-16 & enters into the Men's Singles FINAL ????#TeamIndia | #Cheer4India | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/pUixNYDOtM— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 7, 2022
पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याला पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या झे योंगने पिछाडीवरून पुनरागमन करत त्याला पराभूत केले. श्रीकांतने जबरदस्त सुरुवात करत पहिला गेम २१-१३ असा आपल्या नावे केला होता. त्यानंतर योंग काहीसा आक्रमक झाला. परंतु, श्रीकांतने आघाडी कायम ठेवली होती. सलग चार गुण मिळवत योंग आघाडीवर आला व त्याने ती आघाडी २१-१९ अशी करून गेम जिंकला. शेवटचा गेममध्ये योंगला काही शारीरिक त्रास होत असल्याचे दिसून आले. मात्र, त्याने त्याचा परिणाम आपल्या खेळावर होऊ न देता २१-१० अशा फरकाने गेम आणि सामना आपल्या नावे केला.
भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने उपांत्य सामना जिंकत सुवर्णपदकाची दावेदारी पेश केली. भारताचे महिला व पुरुष दुहेरी तसेच मिश्र दुहेरीचे संघदेखील पदकासाठी आपले सामने खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
CWG BREAKING: बॉक्सिंगमध्ये सोन्याने सुरुवात; नवख्या नीतूचा गोल्डन पंच
सूर्यकुमारच्या फटक्याने चाहत्यांना झाली थेट धोनीची आठवण! पाहा धमाकेदार हॅलिकॉप्टर शॉट
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?