शनिवारी (दि. 10 डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे. झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात भारताच्या सलामीवीराने खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, कमी वयात अशी कामगिरी करणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला. या यादीत गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही समावेश आहे.
बांगलादेश विरुद्ध भारत (Bangladesh vs India) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे मैदानावर उतरले होते. यावेळी धवन 3 धावांवर तंबूत परतला. मात्र, किशन खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी धावा काढल्या. यावेळी त्याने 49 चेंडूत 50 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 7 चौकारही मारले. या अर्धशतकासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
FIFTY!
Ishan Kishan brings up his half-century off 50 deliveries. This is his 4th in ODIs ????????
LIVE – https://t.co/HGnEqtZJsM #BANvIND pic.twitter.com/5CXY5G0SRh
— BCCI (@BCCI) December 10, 2022
किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. त्याने हे अर्धशतक 24 वर्षे आणि 145 दिवसांच्या वयात ठोकले. यासह त्याने या यादीत दुसरे स्थान गाठले. या यादीत अव्वलस्थानी गौतम गंभीर (Gautam Gambhir) असून त्याने 21 वर्षे आणि 184 दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसेच, या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) असून त्याने 24 वर्षे आणि 173 दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक केले होते.
भारताचा 18 षटकांनंतरचा आढावा
शिखर धवन हा बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर उतरला. त्याने ईशान किशनसोबत धावफलक हलता ठेवला. दोघांनीही 18व्या षटकापर्यंत चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने 1 विकेट गमावत 110 धावा केल्या होत्या. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारत मालिकेत एक तरी सामना जिंकेल. कारण, भारताने 2 सामन्यात पराभूत होत ही मालिका आधीच गमावली आहे. (Youngest Indian Opener to Score ODI 50s in Bangladesh ishan kishan in the list)
कमी वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारे भारतीय खेळाडू
21 वर्षे आणि 184 दिवस- गौतम गंभीर
24 वर्षे 145 दिवस- ईशान किशन*
24 वर्षे 173 दिवस- वीरेंद्र सेहवाग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराट, राहुल अन् रोहितने तीन वर्षात किती शतके ठोकली?’, भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा तिखट प्रश्न
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट






