---Advertisement---

कसोटीत कारकिर्दीत कमी वयात ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारे जगातील अवलिया

On: मंगळवार, जुलै 28, 2020 4:57 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या विसडन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने आज कसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट त्याची ५००वी विकेट ठरला.

अशी कामगिरी करणारा तो जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.

१३वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १४०व्या कसोटीत हा टप्पा पार केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांत तो जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

कसोटी कारकिर्दीत कमी वयात ५०० विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने वयाच्या ३१ वर्ष व ११ महिन्यांचे असताना हा कारनामा केला होता. तर ब्रॉडने हा कारनामा ३४ वर्ष व १ महिन्यांचे असताना केला आहे.

कमी वयात कसोटीत ५०० विकेट्स घेणारे गोलंदाज

३१ वर्ष ११ महिने- मुथय्या मुरलीधरन

३४ वर्ष १ महिना- स्टुअर्ट ब्रॉड

३४ वर्ष ६ महिने- शेन वॉर्न

३५ वर्ष १ महिना- जेम्स अँडरसन

३५ वर्ष ४ महिने- अनिल कुंबळे

३५ वर्ष ५ महिने- ग्लेन मॅकग्रा

३८ वर्ष ५ महिने- कर्टनी वॉल्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---