भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक पार्थिव पटेलने आज आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पण करणारा पार्थिव हा, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात युवा यष्टीरक्षक आहे. पार्थिवने आपल्या कारकीर्दीमध्ये मध्ये २५ कसोटी, ३८ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. यात कसोटीत त्याने ९३४ धावा, वनडेत ७३६ धावा आणि टी२०त ३६ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने १९४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
१७ व्या वर्षीच भारतीय संघाकडून पदार्पण
पार्थिवने वयाच्या केवळ १७ व्या वर्षी (१७ वर्ष, १५३ दिवस) २००२ साली इंग्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. इतक्या कमी वयात भारताकडून आतंरराष्ट्रीय सामना खेळणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. कमी वयात यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाकडून खेळण्याच्या बाबतीत दिनेश कार्तिक व अजय रात्रा यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक येतो.
दिनेश कार्तिकने वयाच्या १९ व्या वर्षी (१९ वर्ष, ९६ दिवस) सन २००४ साली वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाकडून पदार्पण केले होते, तर अजय रात्राने वयाच्या २० व्या वर्षी (२० वर्ष, ३७ दिवस) सन २००२ साली इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून भारतीय संघाकडून आपला पहिला आंतररष्ट्रीय सामना खेळला होता.
एमएस धोनीच्या आगमनाने मिळाल्या नाहीत जास्त संधी
माजी कर्णधार एमएस धोनी पार्थिव पटेलचा समकालीन खेळाडू होता. २००४ साली धोनीचे भारतीय संघात आगमन झाले व त्याने मागे वळून न पाहता जवळ- जवळ पुढील १५ वर्ष भारतीय संघात आपलं स्थान भक्कम ठेवलं. धोनीसारखा प्रतिस्पर्धी असल्याने पार्थिव आपल्या कारकिर्दीमध्ये केवळ २५ कसोटी सामने खेळू शकला.
दोन वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना
पार्थिव पटेलने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत खेळला होता. यामध्ये त्याने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात १६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू