मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेचा वीस वर्षीय युवा फिरकीपटू दुनिथ वेललागे याने घातक गोलंदाजी करताना भारताचे प्रमुख पाच फलंदाज तंबूत पाठवले.
मागील सामन्यात शतकी भागीदारी करणाऱ्या रोहित व गिल या जोडीने श्रीलंकेविरुद्धही आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्यांनी 80 धावांची सलामी दिली. मात्र वेललागे गोलंदाजीला आल्यावर त्याने गिलला 19 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मागील सामन्यात शतक ठोकलेल्या विराट कोहली याला केवळ तीन धावांवर माघारी धाडले. तर अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहित शर्मा याचा 52 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव ईशान किशन व केएल राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.
किशन व राहुल यांची भागीदारी भारतीय संघाला पुनरागमन करून देत असतानाच आपल्या दुसऱ्या स्पेमध्ये आलेल्या वेवलागे याने राहुलचा वैयक्तिक 39 धावांवर स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडला. त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पंड्या हा देखील पाच धावांवर तंबूत परतला. विशेष म्हणजे त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्या चेंडूवर आणि अखेरच्या चेंडूवर बळी मिळवला.
त्याने भारतीय संघाविरुद्ध प्रथमच वनडे सामना खेळताना आपल्या दहा षटकांमध्ये फक्त 40 धावा दिल्या. विशेष म्हणजे त्यामध्ये एक षटक त्याने निर्धाव टाकले. वेलेलागे मागील वर्षी पर्यंत श्रीलंकेच्या अंडर 19 संघाचा भाग होता. पुढील महिन्यात होणाऱ्या म्हणजे विश्वचषकासाठी देखील त्याचा श्रीलंका संघात समावेश केला जाऊ शकतो.
(Youngster Dunith Wellalage Picks Fifer Against India In Asia Cup)
हेही वाचा-
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final