मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी माजी कर्णधार युनुस खान यांना इंग्लंड दौर्यासाठी राष्ट्रीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर मुश्ताक अहमद ची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड विरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यास 30 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात 29 ऑगस्टपासून तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होईल.
या नियुक्त नियुक्तीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी वसीम खान म्हणाले की, “मला खूप आनंद होता आहे कि युनिस खान सारखा दिग्गज फलंदाज राष्ट्रीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची फलंदाजी मजबूत होण्यास मदत होणार आहे.”
ते म्हणाले, “मुस्ताक यांना इंग्लंडमधील परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे. ते बरीच वर्षे इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होते. यासोबत इंग्लंड क्रिकेट संघासोबत बरीच वर्षे काम केले आहेत. फिरकी गोलंदाजांना मदत करण्यासोबत मेंटरची भूमिका बजावण्यासाठी मुश्ताक मुख्य प्रशिक्षक मिस्बा उल हक यांना रणनीती बनवण्यासाठी मदत करतील.”
पाकिस्तान क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल युनूस खानने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “पाकिस्तान संघात प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहेत. मिसबाह-उल-हक, मुश्ताक अहमद अाणि वकार यूनिस पाकिस्तान क्रिकेट संघाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू.” मिसबाह ने युनूस खान आणि मुश्ताक अहमद यांना कोचिंग पॅनेलमध्ये नियुक्त करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पाकिस्तानकडून खेळताना युनुस खानने 118 कसोटी सामन्यात 10 हजार 099 धावा केल्या आहेत. 313 ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.आयसीसी कसोटी क्रमवारीत युनूस खान पहिल्या स्थानावर राहिला होता.
पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू पुस्तक अहमद यांनी पाकिस्तानकडून 52 कसोटी सामन्यात 185 गडी बाद केले आहेत. याचसोबत इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ते काम पाहिले आहे.