राजस्थान राॅयल्सने आपला पहिला सामना जिंकत आयपीएलच्या १५ व्या हंगामाची यशस्वी सुरुवात केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ६१ धावांनी विजय मिळवला. राजस्थानने या सामन्यात फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली होती. राजस्थानकडून सॅमसनने अर्धशतक केले आणि शिमरॉन हेटमायर आणि देवदत्त पडीक्कल यांच्या तूफानी खेळीमुळे राजस्थानने २१० धावा केल्या होत्या. यानंतर संघातील युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णाच्या धारदार गोलंदाजीमुळे हैदराबादला १४९ धावांवरच रोखले.
राजस्थान राॅयल्स फ्रॅंचायझीने आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये संघाचा दिग्गज कुमार संगकारा खेळाडूंना भावूक संदेश देताना दिसला, या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिवंगत शेन वाॅर्नची आठवण त्याने काढली. सांगकाराने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना वाॅर्नची आठवण काढत फ्रॅंचायझीची कॅप गर्वाने घालण्याचा सल्ला दिला.
तो म्हणाला, ‘तूम्ही सर्व वाॅर्नसारखेच वेगळे आहात. त्यामुळे आज जेव्हा ही कॅप तूम्ही घातली ती वाॅर्नसाठी, स्वत:साठी आणि फ्रॅंचायझीसाठी घातली.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
“Wear it with pride for Warnie. For the franchise. For yourself”
Before our first game in Pune, @KumarSanga2 had a message for the boys. 🥺💗#RoyalsFamily | #दिलसेरॉयल pic.twitter.com/NH19i3ks5b
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 31, 2022
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वाॅर्नचे मागील महिन्यात हृदय विकाराच्या झटक्याने थायलंडमध्ये निधन झाले. त्याच्या आठवणीत बुधवारी (३० एप्रिल) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. वाॅर्नने राजस्थान संघासाठी पहिले विजेतेपद जिंकले होते. तो ४ वर्ष संघाचा भाग होता आणि त्यानंतर तो प्रशिक्षक आणि ब्रॅंड एम्बेसिडर सुद्धा झाला. त्याने आयपीएलमध्ये ५५ सामन्यांत ५७ विकेट्स घेतल्या आहेत.
अनेक स्टार खेळाडूंनी भरलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने पहिल्या सामन्यात ७ खेळाडूंना राजस्थान संघाकडून पदार्पणाची संधी दिली होती. देवदत्त पडीक्कल, शिमरोन हेटमायर, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन आणि नाॅथन कुल्टर नाइल हे खेळाडू पहिल्यांदाच राजस्थान संघासाठी खेळले आहेत. राजस्थान आपला दूसरा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध २ एप्रिलला डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हम तो दुबे हैं सनम, तुम को भी ले डूबे’, सीएसकेच्या दुसऱ्या पराभवानंतर पडतोय मीम्सचा पाऊस
याला म्हणतात जिगर! ‘विक्रमवीर’ बाबर आझमचं मोहम्मद कैफने केलं तोंडभरून कौतुक
आयपीएलच्या सुरुवातीलाच गंटागळ्या खाणाऱ्या सीएसकेबद्दल ऑसी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला…