---Advertisement---

कौतुकास्पद! पठाण कुटुंबिय पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले धावून, करत आहेत ‘ही’ मदत

---Advertisement---

भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील अनेक राज्यात पुन्हाएकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यासर्व गोष्टींचा मोठा परिणाम देशातील गरिब जनतेवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सध्या अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी, सामाजिक संस्था कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. यात इरफान आणि युसूफ पठाण या बंधूंचाही समावेश आहे.

इरफान आणि युसूफ यांच्या वडीलांच्या नावाने असलेल्या ‘मेहमूद खान एस पठाण पब्लिश चॅरीटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून बडोदामधील गरजवंत कोरोनाग्रस्तांना मोफत अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल युसूफ आणि इरफान यांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या कठीण काळात लोकांना शांत राहा आणि स्वत:ची व आजूूबाजूच्या लोकांची काळजी घ्या असा सल्लाही दिला आहे.

https://twitter.com/iamyusufpathan/status/1387350154487816193

युसूफ आणि इरफान यांनी यापूर्वीही केली आहे मदत
मागीलवर्षी जेव्हा देशात लॉकडाऊन लागले होते, तेव्हा देखील पठाण कुटुंबिय लोकांच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी बडोद्यामधील आरोग्य केंद्राला ४००० मास्क आणि पीपीई कीट दान केले होते. तसेच त्यांनी गरजवंतानां अन्य-धान्य देखील पुरवले होते.

https://twitter.com/IrfanPathan/status/1242037521183195137

पठाण बंधूंनी केली कोरोनावर मात
काही दिवसांपूर्वीच युसूफ आणि इरफान हे दोघेही रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज खेळून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनीही कोरोनावर मात केली असून इरफान पुन्हा एकदा आयपीएलमध्ये समालोजकाच्या भूमीकेत सध्या दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचीही भारतातील कोरोनाग्रस्तांसाठी मदत
सध्याची भारतातील परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि ब्रट ली यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. पॅट कमिन्सने पंतप्रधान मदत निधीला ५० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपये दान केले आहेत. तसेच त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत ब्रेट लीने देखील आता भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने एक बिटकॉईनची मदत भारताला केली आहे. ज्याची भारतीय रुपयात सध्या किंमत तब्बल ४१ लाख १ हजार रुपये इतकी आहे.

मागीलवर्षी भारतीय क्रिकेटपटूंनीही केली होती मदत 
मागीलवर्षी भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत केली होती. यात विराट कोहली, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली, गौतम गंभीर, रोहित शर्मा, अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याशिवाय बीसीसीआयने देखील ५१ कोटी रुपये दान केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! ‘शुटर दादी’ देखील अडकली कोरोनाच्या विळख्यात, ट्विटरवरुन दिली माहिती

विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच

रियान पराग म्हणतो, जान्हवी कपूरप्रमाणे डान्स करायचा होता, पण नंतर…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---