पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज सेमी फायनल क्वालिफायर 2 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 4 मध्ये पराभूत पालघर संघ विरुद्ध एलिमिनेटर 4 मध्ये विजयी नाशिक संघ यांच्यात हा सामना झाला. नाशिक संघाने पहिल्या चार मिनिटात चार गुण मिळवत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर पालघर कडुन प्रतिक जाधव व पियुष पाटील यांनी चढाईत तर प्रेम मंडळ ने पकडीत गुण मिळवत सामन्यात चुरस आणली होती. 13 मिनिटाच्या खेळानंतर सामना 10-10 असा बरोबरीत सुरू होता.
पालघर कडून प्रतिक जाधव ने चढाईत आक्रमकता दाखवत गुण मिळवले. मध्यंतराला पालघर संघाकडे 16-15 अशी 1 गुणांची आघाडी होती. पालघरच्या जीत पाटील ने उत्कृष्ट पकडी करत नाशिकच्या चढाईपटूंना रोखले होते. मध्यांतरा नंतर 7 व्या मिनिटाला पालघर संघाने नाशिक संघाला ऑल आऊट करत 23-18 महत्वपूर्ण आघाडी मिळवली. त्यानंतर पालघर संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामन्यावर पकड ठेवली.
नाशिक कडून प्रविण व्हडगर ने अष्टपैलू खेळ करत चांगली लढत दिली. 2 मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाकडे 29-26 अशी आघाडी होती. उत्तराधार्थ प्रतिक जाधव ने गुण मिळवत आपल्या संघाला 32-27 असा विजय मिळवून दिला. प्रतिक जाधव ने पकडीत 8 गुण मिळवले तर जीत पाटील ने पकडीत 5 गुण मिळवले. हर्ष मेहेर ने अष्टपैलू खेळ करत 4 गुण मिळवले. नाशिक कडून प्रविण व्हडगर ने अष्टपैलू खेळ करत 6 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- जीत पाटील, पालघर
कबड्डी का कमाल – जीत पाटील, पालघर