पुणे – युवा कबड्डी सिरीज मध्ये आजचा तिसरा सामना एलिमिनेटर सामना होता. प्रमोशन फेरीतील सातव्या क्रमांकावरचा मुंबई शहर विरुद्ध रेलीगेशन फेरीतील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला रायगड संघ यांच्यात लढत झाली. रायगड कडून प्रशांत जाधव व अनुराग सिंग यांनी जोरदार सुरुवात करत करून दिली होती. तर सामन्याच्या पाचव्या मिनिटाला रायगड संघाने मुंबई शहराला ऑल आऊट करत 10-02 अशी आघाडी मिळवली.
मुंबई शहर कडून राज आचार्य ने चढाईत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. रायगड संघाकडे 19-12 अशी आघाडी होती. रायगड कडून अनुराग सिंग व प्रशांत जाधव ने उत्कृष्ट खेळ करत संघाची आघाडी कायम ठेवली. मध्यंतरा सामना चुरशीचा झाला. राज आचार्य, अनिकेत मिटके व प्रणिल म्हात्रे यांनी चपळाई ने गुण मिळवत सामन्यात रंगत आणली होती. दोन्ही संघाचे चढाईटपटूंनी गुण मिळवले. बचावपटूंची कामगिरी साधरण होती.
सामन्याची 7 मिनिटं शिल्लक असताना रायगड संघाकडे 6 गुणांची आघाडी होती. त्यानंतर राज आचार्य ने एकतर्फी खेळ करत सामन्याला कलाटणी दिली. 1 मिनिटं शिल्लक असताना राज आचार्यने चलाखीने 2 खेळाडूंना बाद करत रायगड संघाला ऑल आऊट करत 31-28 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अनुराग सिंग व प्रशांत जाधव ने गुण मिळवत सामना 30-31 असा जवळ आला होता राज आचार्यला फक्त शेवटच्या चढाईत ब्लॉक लाईन पार करून यायचं होत मात्र त्याने 4 गुणांची सुपर रेड करत सामना 35-30 असा जिंकला.
राज आचार्य ने संपूर्ण सामन्यात सर्वाधिक 20 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- राज आचार्य, मुंबई शहर
बेस्ट डिफेंडर- वैभव मोरे, रायगड
कबड्डी का कमाल – राज आचार्य, मुंबई शहर