पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज सेमी फायनल क्वालिफायर 1 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 3 मध्ये पराभूत नंदुरबार संघ विरुद्ध एलिमिनेटर 3 मध्ये विजयी सांगली संघ यांच्यात हा सामना झाला. नंदुरबार संघाकडून जयेश महाजन ने जोरदार सुरुवात करत संघाला आघाडी मिळवून दिली. चौथ्या मिनिटाला नंदुरबार संघाने सांगली संघाला ऑल आऊट करत 9-1 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर वरुण खंडले ने आक्रमक खेळ करत सांगली संघाला पिछाडीवर टाकले. सातव्या मिनिटाला दुसऱ्यांदा ऑल आऊट करत 18-01 अशी आघाडी मिळवली.
सांगलीच्या अभिषेक गुंगे ने चपळाईने चढाया करत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. मध्यंतरा पूर्वी सांगली संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत आपली पिछाडी कमी करत 15-28 अशी केली. मध्यंतरा अभिराज पवार ने जोरदार चढाया करत नंदुरबार संघावर दुसरा लोन पाडत सामना 23-28 असा जवळ आणला. त्यानंतर दोन्ही संघाच्या मध्ये चांगली चुरस बघायला मिळाली. सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना सामना 32-32 असा बरोबरीत चालू होता. दोन्ही संघाच्या चढाईपटूंनी झटापट गुण मिळवत सामन्यात रंगत आणली होती. अखेर 40 मिनिटाच्या खेळानंतर सामना 45-45 असा बरोबरीत राहिला.
अतिरिक्त 3-3 मिनिटाच्या खेळात सांगली संघांचे चढाईपटू नंदुरबार संघावर भारी पडले. अभिराज पवार व अभिषेक गुंगे यांनी 01-19 अश्या अश्या पिछाडीवरून सांगली संघाला 55-52 असा थरारक विजय मिळवून दिला. अभिषेक गुंगे ने चढाईत 19 तर अभिराज पवार ने 18 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर नंदुरबारच्या जयेश महाजनने अष्टपैलू खेळी करत चढाईत 16 तर पकडीत 6 गुण मिळवत संघर्ष पूर्ण लढत दिली.
बेस्ट रेडर- अभिषेक गुंगे, सांगली
बेस्ट डिफेंडर- जयेश महाजन, नंदुरबार
कबड्डी का कमाल – अभिषेक गुंगे, सांगली