झिम्बाब्वे आणि भारत संघातील हरारे येथे झालेला तिसरा व अखेरचा वनडे सामना शुबमन गिल याने गाजवला. २२ वर्षीय गिलने या सामन्यात शानदार शतक केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १३ धावांनी हा सामना जिंकला. त्याच्या या शानदार खेळीचे फळ त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देत करण्यात आले. त्याच्या या खेळासाठी अनेक जण कौतुक करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यानेदेखील ट्विट करत त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर आता रिषभ पंतने त्यावर एक मिश्किल टिप्पणी केली आहे.
गिलने या सामन्यात ९७ चेंडूवर १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावा केल्या. संपूर्ण मालिकेचा विचार केल्यास त्याने या तीन सामन्यात मिळून एक शतक व एक अर्धशतकाच्या मदतीने २४५ धावा केल्या.
अशा शानदार काम केल्यानंतर त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने ट्विट करत लिहिले,
Finally!!! Well played @ShubmanGill u seriously deserved that Ton ! Congratulations on your first 💯 many more to come this is just a start 🤛 #indiavszim
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 22, 2022
“छान खेळलास, शेवटी तुझे पहिले शतक आलेच. अशी आणखी खूप शतके येणार आहेत.”
त्यावर भारताचा प्रमुख यष्टीरक्षक रिषभ पंतने ट्विट कमेंट केली. ‘याला असं काय समजावलं की आता हा थांबतच नाही.”
मागील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रिषभ पंतने शतक झळकावत भारतीय संघाला मालिका जिंकून दिली होती. त्यानंतर युवराजने लिहिलेले की, माझ्याशी ४५ मिनिटे बोलल्याचा तुला फायदा झाला आहे. याच मुद्द्यावरून आता पंतने युवराजची मस्करी केल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलचा फॅन निघाला ‘हा’ झिम्बाब्वेचा खेळाडू, २५ वर्षानंतर भारताविरुद्ध घेतल्या पाच विकेट्स
तू मेरा हिरो..! मोहम्मद सिराजवर झिम्बाब्वेच्या पोरी फिदा, महिला चाहत्यांची फोटो काढण्यासाठी गर्दी