---Advertisement---

हरभजनच्या त्या ट्विटवर युवराज सिंगने ‘हे’ उत्तर देत केले टीम इंडियाला ट्रोल

---Advertisement---

भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातील चौथा क्रमांक मागील अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. या क्रमांकावर भारतीय संघाने अनेक खेळाडूंना संधीही दिली आहेत. या क्रमांकाबद्दल अनेकांनी विविध मतेही मांडली आहेत.

आता हरभजन सिंगने मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी देण्याबाबत सुचवले आहे. याबद्दल हरभजनने एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यादवचा फोटो शेअर केला आहे आणि ट्विट केले आहे की ‘माहित नाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये एवढ्या धावा करुनही त्याची अजून भारतासाठी निवड का झाली नाही. सुर्यकुमार यादव मेहनत घेत रहा. तूझी वेळ नक्की येईल.’

हरभजनच्या या ट्विटवर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. युवराजने म्हटले आहे की ‘यार, मी तूला सांगितले ना, त्यांची(भारताची) वरची फळी मजबूत आहे. त्यांना चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची गरज नाही.’

भारतात सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सुर्यकुमार यादवने 28 सप्टेंबरला मुंबईकडून खेळताना छत्तीसगड विरुद्ध 31 चेंडूत तुफानी 81 धावांची खेळी केली होती.

तसेच या महिन्यांच्या सुरुवातीलाही हरभजनने युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा पर्याय चौथ्या क्रमांकासाठी सुचवला होता. त्याने त्यावेळी ट्विट करत सॅमसन चौथ्या क्रमांकासाठी चांगला पर्याय असल्याचे म्हटले होते.

हरभजनच्या या ट्विटवरही युवराजने असेच म्हटले होते की ‘वरची फळी खूप मजबूत असल्याने त्यांना चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचे नाते आहे खास!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एमएस धोनीचे केले या शब्दात कौतुक

पंत-साहापैकी या खेळाडूला मिळाली संधी; द. अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment