क्रिकेट म्हटलं की विक्रम येतातच. त्यात जर ती नाव युवराज सिंग किंवा मुथय्या मुरलीधरन असेल तर विचारू नका. असंख्य विश्वविक्रम या दोन खेळाडूंच्या नावावर आहेत. परंतु काल असा एक विक्रम युवराजच्या नावावर झाला जो कुणाही खेळाडूला नको वाटेल.
कोणताही खेळाडू नेहमी आपल्या देशाकडून संधी आपल्याला खेळण्याची संधी मिळावी असे स्वप्न पाहत असतो. ते स्वप्न पूर्ण झाले की कधीतरी आपल्याला देशाचं त्याच खेळात नेतृत्व करता येण्याचं त्याच स्वप्न असत. परंतु मुरलीधरन किंवा युवराज या दोनही खेळाडूंना ही संधी कधीही मिळाली नाही.
३०० एकदिवसीय सामने खेळलेल्या युवराज सिंगला कधीही भारतीय संघाचं नेतृत्व करायला मिळालं नाही. युवराज नंतर भारतीय संघात आलेले आणि युवराज पेक्षा कमी सामने खेळलेले सेहवाग, रैना, रहाणे आणि अगदी अलीकडे विराट कोहलीलाही भारतीय संघाचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करायची संधी मिळाली.
४० कसोटी, ३०० एकदिवसीय सामने आणि ५८ टी २० युवराजने सामने खेळले. परंतु यातील कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात त्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचीही तीच गत. १३० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने आणि १२ टी२० सामने श्रीलंकेकडून खेळलेल्या मुरलीधरनलाही कधीच लंकेच नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळलेल्या तब्बल १९ पैकी १७ खेळाडूंनी एकदातरी देशाचं एकदिवसीय सामन्यात नेतृत्व केलं आहे.