---Advertisement---

मैदानावर पुन्हा घोंगावलं ‘युवी’ नावाचं वादळ! सिक्सर किंगने एकाच षटकात लगावले ४ षटकार; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स व वेस्ट इंडीज लिजेंड्स यांच्यादरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने ३ बाद २१८ धावा ठोकल्या. पुन्हा एकदा कर्णधार सचिन तेंडुलकर व युवराज सिंग भारताच्या डावाचे नायक ठरले. युवराजने सहा षटकार मारत चाहत्यांचे मनोरंजन केले.

भारताची दमदार सुरूवात
इंडिया लिजेंड्ससाठी कर्णधार सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी सुरुवात केली. सेहवागने आपल्या चिरपरिचित अंदाजात पहिल्या चेंडूपासून चौकार-षटकार मारण्यास सुरुवात केली. त्याने १७ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्यानंतर, दुसऱ्या गड्यासाठी सचिन व मोहंमद कैफ यांच्यादरम्यान ५३ धावांची भागीदारी झाली. कैफ बाद झाल्यानंतर युसूफ पठाणला चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. दरम्यान सचिनने सलग दुसऱ्या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने, ६५ धावा केल्या.

मैदानात युवराज नावाचे वादळ
सचिन बाद झाल्यानंतर युवराज सिंग फलंदाजीसाठी आला. १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महेंद्र नागामुट्टूने त्याचा सोपा झेल सोडला. त्याचा फायदा त्याने पुढच्याच षटकात घेतला. नागामुट्टूने टाकलेल्या त्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर त्याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. चौथा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा पाचव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. युवराजने अखेरच्या षटकात पुन्हा दोन षटकार लगावले. तो २० चेंडूमध्ये ४९ धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत सहा षटकार व एक चौकार मारला.

 

युवराज सोबतच युसूफ पठाणने देखील आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने २० चेंडूंचा सामना करताना २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ३५ चेंडूंमध्ये ७८ धावांची स्फोटक भागीदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय महिला संघाच्या पदरी पुन्हा निराशा, दक्षिण आफ्रिका महिलांचा शानदार मालिकाविजय

नुकताच विवाहबंधनात अडकलेला जसप्रीत बुमराह ‘या’ तारखेला पतरणार क्रिकेटच्या मैदानात

इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू देखील ‘मिस्टर ३६०’; भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---