कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंसमोर घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. अशामध्ये चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी क्रिकेटपटू इंस्टाग्रामच्या माध्यमातून लाईव्ह येत आहेत.
यामध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) एक प्रश्न विचारला होता. विराटच्या प्रश्नावर युवराजने उत्तर देत बुमराहची बोलती बंद केली होती.
तरीही युवराजला बुमराहला उत्तर देता येत नाही हे समजल्यानंतर बुमराहनेही युक्ती लढवत मजेशीर उत्तरे दिली.
खरंतर युवराजने विराटबद्दल बुमराहला पहिला प्रश्न विचारला होता की, विराट आणि स्वीडिश फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचपैकी (Zlatan Ibrahimovic) त्याचा फीटनेस आदर्श कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर बुमराहला द्यायला थोडा उशीर झाला. परंतु त्याने यावेळी उत्तर देत म्हटले की, “तो स्वत:च फीटनेस आदर्श आहे. तसेच झ्लाटन हा माझा फीटनेस आदर्श नाही, तर तो वैयक्तिक जिवनातील आदर्श आहे.” यावर युवराजने बुमराहची थट्टा करत म्हटले की, म्हणजे विराट तुझा फीटनेस आदर्श नाही.
सर्वांना माहिती आहे की, बुमराह झ्लाटनचा किती मोठा चाहता आहे. बुमराह झ्लाटनशी खूप प्रभावित आहे. झ्लाटनने फुटबॉलजगतात प्रत्येकाला चूकीचे ठरविले आहे. कारण ३८ वर्षांंच्या वयात जे खेळाडू निवृत्तीचा विचार करतात. त्या वयात लाटनने मोठ-मोठ्या संघांविरुद्ध उत्कृष्ट गोल केले होते.
यानंतर युवराजने विराट आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या खेळाडूंपैकी एक आपला आवडता खेळाडू म्हणून निवडण्यास सांगितले होते.
या प्रश्नावर बुमराहने म्हटले की, “मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळून केवळ ४ वर्षे झाली आहे. तसेच या खेळाडूंनी तर खूप सामने खेळले आहेत. पहिल्यांदा मी उत्तर दिले की, माझा सर्वात आवडता फलंदाज सचिन ‘कोहली’ आणि दुसरा विराट ‘तेंडुलकर’ आहे.” परंतु युवराजने त्याला स्पष्टपणे सांगितले की, “तो आत्मचरित्र लिहित नाही. मला स्पष्ट उत्तरे दे.”
बुमराहने युवराजला सांगितले की, “हा खूप मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न मला संकटात टाकू शकतो. तरी खूप चर्चेनंतर मी उत्तर दिले की, माझा आवडता फलंदाज हा युवराज सिंग आहे.” परंतु हा पर्याय युवराजने दिला नव्हता.
बुमराह पुढे म्हणाला की, “मी सचिनला खेळताना पाहिले आहे आणि विराटबरोबर खेळलो आहे. परंतु मी याचे उत्तर नाही देऊ शकत. विराट आणि सचिन दोघेही माझे आवडते फलंदाज आहेत. मी सर्व दिग्गजांचा आदर करतो.” त्यामुळे बुमराहने युवराजला प्रश्न बदलण्यास सांगितले.
तरीही यानंतर युवराजने त्याला प्रश्न विचारले. ज्याची बुमराहने अगदी सहजपणे उत्तरे द्यायला सुरुवात केली.
खरंतर या लाईव्ह चॅटदरम्यान युवराजने बुमराहला एकूण ११ प्रश्न विचारले होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बुमराहला केवळ ५ सेकंद दिले होते. सुरुवातील बुमराहने ५ सेकंदापेक्षाही कमी वेळात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. परंतु विराटबद्दल विचारण्यात आलेल्या २ प्रश्नांवर त्याची गडबड झाली होती.
ट्रेंडिंग लेख-
-का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?
-त्या दिवशी सचिनने मुंबईच्या लोकलने केला होता शेवटचा प्रवास
-वनडेतील आजपर्यंतचे सर्वात वयस्कर ५ कर्णधार, भारतीय कर्णधारांमध्ये धोनीसह ही २ नावं