भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले. युवीने त्याची इंस्टाग्राम रील बनवून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या मजेदार व्हिडिओमध्ये युवराज सिंग गो टू अ डिस्को या गाण्यावर डान्स करताना दिसला. युवराज सिंगने डान्स व्हिडिओला “वीकेंड वाइब्स” असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/reel/ChcVnQVBSFc/?utm_source=ig_web_copy_link
युवराज सिंगचा हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अडीच लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर काही चाहत्यांनी युवराज सिंगचे जोरदार कौतुक केले आहे. काही युजर्सनी इमोजी बनवून क्रिकेटरबद्दलची आपुलकी दाखवली. एका चाहत्याने तर ‘पाजी ऐकले आहे की तुम्ही मैदानात परतत आहात’, असा सवालही केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत:ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचे निधन