भारताचा माजी अष्टपैलू व भारतीय संघाला २०११ वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराज सिंगने सोशल मीडियावर भारताचा वरिष्ठ फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास संदेश लिहिला आहे. पोस्टमध्ये युवराजने विराट कोहलीचा एक महान कर्णधार आणि महान नेता असे संबोधले आहे. युवीने त्याच्या इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सोनेरी रंगाच्या शूजची जोडी ठेवली आहे. त्याचवेळी दुसऱ्या फोटोमध्ये युवीने कोहलीसाठी लिहिलेले पत्र ठेवले आहे. तिसरा फोटो युवी आणि कोहलीचा आहे, जो खूप जुना आहे.
युवीने कोहलीसाठी लिहिले, ‘तू जगासाठी किंग कोहली असला तरी, माझ्यासाठी नेहमीच चिकू राहशील. तुझ्या आतली आग पेटती राहू दे. तू सुपरस्टार आहेस. हे सोनेरी बूट तुझ्यासाठी आहेत. तुझा देशाला नेहमी अभिमान वाटावा.’
https://www.instagram.com/p/CaRIiaTvIA7/?utm_medium=copy_link
युवराज सिंगने आपल्या पत्रामध्ये लिहिले, ‘विराट, मी तुला क्रिकेटर आणि माणूस म्हणून वाढताना पाहिले आहे. भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून चालणारा नेटमधील एक तरुण मुलगा आज स्वत: एक महान खेळाडू बनला. तुझी शिस्त, उत्साह आणि मैदानावरील त्याग या देशाच्या प्रत्येक युवा क्रिकेटपटूसाठी प्रेरणा आहे. ज्यांनी एक दिवस या देशासाठी निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहिले आहे.’
युवराजने आपल्या पत्रामध्ये पुढे लिहिले,
“तू दरवर्षी तुझ्या खेळाचा स्तर उंचावला आहे. तू खूप काही साध्य केले आहे. तू एक उत्कृष्ट कर्णधार आणि एक अद्भुत नेता आहेस. मला तुला आणखी धावांचा पाठलाग करताना बघायचे आहे. मला आनंद आहे की मी एक खेळाडू आणि एक मित्र म्हणून तुझ्याशी जोडलो आहे. आपण मिळून धावा केल्या, लोकांचे पाय ओढले, पंजाबी गाण्यांवर नाचलो आणि अनेक स्पर्धा जिंकल्या.”
विराट कोहली सध्या भारतीय संघातून ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. विराट श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराट मोहालीत १०० वा कसोटी सामना खेळेल. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी२० मध्ये कोहलीची बॅट जबरदस्त बोलली. या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत प्रेक्षकांना विराटकडून ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅप विजेताच म्हणतोय, “आयपीएलमध्ये लिलाव नसावा” (mahasports.in)






