---Advertisement---

एक्स गर्लफ्रेंडने केली युवराजच्या पोस्टवर कमेंट; लोक म्हणतात, तू आता मंगळ ग्रहावर जा!

On: शनिवार, जून 13, 2020 7:58 AM
---Advertisement---

२००७ सालच्या टी२० विश्वचषकात ६ चेंडूंवर ६ षटकार मारणाऱ्या आणि २०११ सालच्या विश्वचषकात मालिकावीर ठरणाऱ्या युवराज सिंगने गतवर्षी १० जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतली होती. या गोष्टीला बुधवारी (१० जून) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे युवराजच्या क्रिकेट कारकिर्दीतील गोष्टींना उजाळा दिला. अनेकांनी त्याला पहिल्या निवृत्ती वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

युवराजनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्याने संदेश देत लिहिले की, “प्रिय चाहत्यांनो, मी तुमच्या प्रेमासाठी सर्वांचा आभारी आहे. जसे क्रिकेट माझ्या जिवनाचा अभिन्न अंग आहे. तसे तुम्हीही माझ्या जिवनाचा भाग आहात. जबाबदार भारतीय नागरिकाप्रमाणे आपल्याला कोरोना व्हायरसच्या सरकारी निर्देशांचे पालन करायचे आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे.”

युवराजच्या या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा हिने कमेंट केले आहे. तिने युवराजला सार्वकालिन सर्वोत्कृष्ट (GOAT- Greatest Of All Time) क्रिकेटपटू म्हटले. एका दशकापुर्वी युवराज आणि किम यांच्या संबंधाविषयी खूप चर्चा होत असायची. एका वृत्तात दिले गेले होते की, किमच्या विचित्र स्वभावामुळे आणि तिच्या गैरवागणुकीला कंटाळून युवराजने त्यांच्यातील संबंध तोडले. परंतु, त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. गतवर्षी युवराजच्या निवृत्तीच्या पार्टीमध्येही किम शर्माने उपस्थिती लावली होती.

कदाचित याच कारणामुळे चाहत्यांनी किमच्या कमेंटवर अनेक कमेंट केल्या. काहींनी तर तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. एका चाहत्याने तर लिहिले की, “युवी सिंह आहे गोट नाही. राँग नंबर! आणि युवी सिंहनीसोबत त्याचे विवाहित जिवन आनंदाने व्यतित करत आहे. त्यामुळे तू मंगळ ग्रहावर जाऊन रहा.” तर एकाने कमेंट केली की, “तू अजूनही युवीवर प्रेम करतेस का?”

https://www.instagram.com/p/CBQD7MgjncP/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

युवराजच्या पहिल्या निवृत्ती वर्धापन दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोघांचा फोटो शेअर केला होता. तसेच, सचिनच्या युवराजसोबतच्या पहिल्या भेटीचा कॅप्शनमध्ये उल्लेख केला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

आपल्या मुलीचे नाव भारतप्रेमाने ‘इंडिया’ ठेवणाऱ्या जाॅन्टी रोड्सचा हा खास व्हिडीओ पाहिलाय का?

भारताविरुद्ध ‘तो’ २८० धावांवर असताना कर्णधाराने डाव घोषीत…

जेव्हा पंड्याने घेतल्या होत्या ३ चेंडूत ३ विकेट्स, तेव्हाची…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---