भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग हे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची मैत्री फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही पाहायला मिळते. जेव्हाही ते दोघे संघात एकत्र असायचे तेव्हा खूप मस्ती करत असायचे. शिवाय, दोघांच्याही मस्तीखोर स्वभावाला सर्वांनी ‘१० का दम’ या टिव्ही शोमध्ये पाहिले असणार.
२०१०मध्ये युवराज आणि हरभजन ‘१० का दम’ या टिव्ही शोमध्ये गेले होते. त्या शोचा होस्ट प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान होता. शोमधील चर्चेदरम्यान सलमानने दोघांनाही प्रश्न केला होता की, तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे? यावर युवराज आणि हरभजनने मजा घेत कॅटरिना कैफचे नाव घेतले. हे ऐकून सलमानने उलट त्यांची मजा घेतली आणि दोघांनाही हसत हसत शोमधून बाहेर निघून जा म्हणाला.
त्याकाळात सलमान कॅटरिना कैफला डेट करत असल्याची वृत्त माध्यमांत येत असतं. युवराज, हरभजन यांचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तिंसोबत खूप चांगले संबंध आहेत. २००४मध्ये सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ या हिंदी चित्रपटात हरभजनला गेस्टच्या रुपात बोलावण्यात आले होते.
युवराजने भारताकडून ४० कसोटी, ३०४ वनडे आणि ५८ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १९००, वनडेत ८७०१ आणि टी२०त ११७७ धावा केल्या होत्या.
तर हरभजनने भारताकडून खेळताना १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. तर, वनडेत २३६ सामन्यात २६९ विकेट्स आणि टी२०त २८ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल
पाकिस्तान सुपर लीग लागली भिकेला, आता विक्रीत काढल्या…
आम्ही काय फुटाणे विकत होतो काय? ‘या’ खेळाडूच्या वक्तव्यावर वैतागला इरफान