मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल १४ च्या मोसमात पहिला सामना जरी हारला असला तरी नंतरच्या दोनही सामन्यात संघाने विजयश्री मिळवली. मुंबई इंडियन्स संघाच्या तिसऱ्या सामन्यात संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 22 चेंडूत 35 धावा करणाऱ्या कायरन पोलार्डला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पण माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
युवराजने म्हटले आहे की या सामन्यात पोलार्डपेक्षाही पंड्याने महत्त्वाच्या वेळी चांगली कामगिरी केल्याने त्याला सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता.
एकीकडे पोलार्डने शेवटच्या षटकात संघाला आवश्यक धावा मिळवून दिल्या. मधल्या षटकांत मुंबईचा डाव गडगडला आणि त्यांची धावसंख्या १८ षटकांत फक्त १२६ होती. पण नंतर पोलार्डने शेवटच्या २ षटकांत २४ धावा करून मुंबईला १५० पर्यंत नेले आणि संघाच्या १३ धावांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, फलंदाजीवेळी पंड्याने केवळ ७ धावा केल्या होत्या.
असे असताना युवराज पंड्याला सामनावीर पुरस्कार मिळावा, असे का म्हटला, असा प्रश्न अनेकांना पडला. तर त्याचे कारण असे की पंड्याने जेव्हा हैदराबाद संघ विजयाच्या जवळ होता, तेव्हा उत्तम क्षेत्ररक्षण करत २ फलंदाजांना धावबाद केले. ज्यामुळे हा सामना मुंबईच्या बाजूने फिरला.
युवराजने ट्वीटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. त्याने ट्विट केले की ‘सामनावीर! हार्दिक पंड्या, ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणातून खेळ बदलला.’
याबरोबरच युवराजने मुंबई इंडियन्सच्या अन्य खेळाडूंचेही कौतुक केले. त्याने ट्विटमध्ये पुढे म्हटले, ‘जस्सी (जसप्रीत बुमराह) सारखा कोणीच नाही. अखेरच्या षटकांचे किंग जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट. मुंबई इंडियन्सला माहित आहे की दबावातील सामने कसे जिंकायले. मुंबई अव्वल असण्याला नक्कीच कारणे आहेत. कर्णधार रोहित शर्मा तू करु शकतो.’
Man of the match ! Hardik pandya!! Game changer in the field ! Jassi jaisa koi nahi !!king at death bowling @Jaspritbumrah93 @trent_boult @mipaltan surely know how to win pressure games !! No 1 team for a reason #SRHvMI @ImRo45 hitmannn!! you can !!captain 👨✈️
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 17, 2021
हार्दिक पांड्याने सर्वात आधी डेव्हिड वॉर्नरला (३६) त्याच्या सरळ थ्रोवरून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याने त्याच पद्धतीने सरळ थ्रोवर युवा अब्दुल समदलाही (७) धावबाद केले. त्यामुळे जिंकत आलेला सामना हैदराबाद संघाने गमावला. हा हैद्राबाद संघाचा सलग तिसरा पराभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबाद संघात केदार जाधवला स्थान देण्याची ‘या’ माजी खेळाडूने केली मागणी
पृथ्वी शॉचा अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा षटकार, पाहा व्हिडिओ
‘बर्थडे स्पेशल’ अर्धशतक करत केएल राहुलने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान