अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये रूट आणि कोहली यांच्यात वारंवार तुलना होत आहे. जगातील सर्व महान खेळाडूंनी यावर आपलं मत मांडलंय. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं जो रूटला विराट कोहलीपेक्षा चांगला फलंदाज म्हटलं होतं.
आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानं देखील यावर आपलं मत मांडलं. युवीनं सांगितलं की, दोन खेळाडूंची तुलना करणं कसं अवघड आहे. सध्याचा फॉर्म पाहता त्यानं जो रूटचं वर्णन एक उत्तम कसोटी फलंदाज म्हणून केलं, परंतु त्यानं विराट कोहलीचंही कौतुक केलं.
‘क्लब प्रेयरी फायर पॉडकास्ट’मध्ये युवराज सिंगसह मायकेल वॉन आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्ट देखील उपस्थित होते. युवीला विराट कोहली आणि जो रूट यांच्यातील तुलनेबद्दल विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, “जर तुम्ही इंग्लंडमध्ये खेळत असाल तर तुम्ही जो रूटची निवड कराल यात शंका नाही. पण जर तुम्हाला जगभरात खेळायचं असेल तर मी विराट कोहलीची निवड करेल. कारण मला माहित आहे की अशा काही खेळपट्ट्या आहेत, ज्यावर तो प्रतिस्पर्धी संघाचं खूप नुकसान करू शकतो.”
युवराज पुढे म्हणाला, “हा प्रश्न खूपच वादातीत आहे. सध्याचा फॉर्म बघितला तर मी नक्कीच जो रूटची निवड करेन, पण जर तुम्ही सर्व फॉरमॅट बघितले तर मी विराट कोहलीची निवड करेन यात शंका नाही.
विराट कोहली सध्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेत खेळत आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात तो काही विशेष करू शकला नाही. कोहलीनं अलीकडच्या काळात फार कमी कसोटी सामने खेळले आहेत. यावर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा कोहली कसोटी संघाचा भाग नव्हता. त्यानं घरगुती कारणामुळे विश्रांती घेतली होती.
हेही वाचा –
काय सांगता! भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याचं तिकीट फक्त 342 रुपयांना! या दिवशी होणार ‘महामुकाबला’
बांग्लादेशला मोठा धक्का; अष्टपैलू खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा
राशिद खाननं केला वयाचा घोटाळा? अफगाणिस्तानच्या कर्णधारानं सांगितलं खरं वय