सध्या भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यात पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीची कामगिरी मोलाची ठरली आहे.
परंतु काल विराट सर्वत्र दोन कारणांमुळे चर्चेत राहिला. एक म्हणजे काल त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ३०० वा सामना खेळला. अशी कामगिरी करणारा तो केवळ ५वा भारतीय खेळाडू ठरला.
तर दुसरं कारण होत भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध केलेला एक फोटो. यात युवराज आणि त्याच्यासारखाच दिसणाऱ्या एका फॅनचा फोटो आहे. त्यात त्या व्यक्तीने युवराजच्या खांद्यावर हात ठेवला आहे तर युवराज हसताना दिसत आहे. हे छायाचित्र एडगबास्टोन क्रिकेट मैदानाच्या बाहेर घेतलं गेलं आहे.
तसेच या फोटोला एक कॅप्शन देण्यात आला आहे ज्यात दोन युवराज असं म्हणून पुढे विचार करायची स्माईली वापरली आहे. तसेच काय वाटत असं त्याचा अर्थ होता.
.@YUVSTRONG12 X 2 🤔 pic.twitter.com/VbC4sWETUk
— BCCI (@BCCI) June 15, 2017
त्याला युवराजने नो चान्स असा रिप्लाय केला आहे.
No chance 🤣
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 15, 2017
त्यावर रॉबिन उथप्पाने हसून रिप्लाय केला आहे.
Hahahahahahaha 🤣🤣🤣🤣
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) June 15, 2017
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना उद्या होत असून युवराजच्या चाहत्यांना युवराजकडून जबदस्त कामगिरीची अपेक्षा आहे.