भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बेंगलोरमध्ये असलेल्या बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट आकादमीवर(एनसीए) होत असलेल्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे.
खेळाडूंच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करण्याबाबत एनसीएबद्दल खेळाडूंमध्ये असंतोष वाढत आहे. तसेच भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत संघर्ष करत आहेत. त्यामुळे एनसीएवर होणाऱ्या टीकेला आणखी जोर मिळाला आहे.
शमी काही दिवसांपूर्वी यो-यो टेस्ट अपयशी झाला होता तर भुवनेश्वर कुमारला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध 1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे.
तसेच वृद्धिमान सहाला देखील दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले आहे. त्याच्या ऐवजी कसोटी संघात दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
मात्र युवराजने एनसीएला पाठींबा देणारे ट्विट करुन टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘एनसीए बाबत मी होणारी टीका ऐकली. त्यामुळे मला माझा अनुभव सांगायला आवडेल. मी कॅन्सरनंतर पुनरागमन करु शकलो कारण बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसारखी चांगली सुविधा सुरु केली आहे. जी देशातील खेळाडूंना चांगल्या फिजीओ आणि ट्रेनर्सच्या मदतीने दुखापतीतून बाहेर येण्यास मदत करते.’
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1020283302073323520
युवराज जून 2017 पासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो 2017 मध्ये विंडिज विरुद्ध शेवटचे भारतीय संघातून खेळला आहे. तसेच मधे तो यो-यो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाला होता. मात्र त्यानंतर त्याने ही फिटनेस टेस्ट त्याने यशस्वीरित्या पार केली.
महत्त्वाच्या बातम्या:
–अनिल कुंबळेचा विक्रम थोडक्यात वाचला, दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एका डावात बाद केले 9 फलंदाज
–म्हणून सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट अकादमी
–एमएस धोनीचा बाथरुममधील हा व्हिडिओ होतोय वायरल!