---Advertisement---

इरफान पठाण- युवराज ट्विटरवरच एकमेकांना भिडले, तुला म्हणायचंय का भारताकडे….

On: बुधवार, जुलै 22, 2020 2:24 PM
---Advertisement---

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने एकट्याच्या जीवावर इंग्लंडला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध १-१ बरोबरी साधली.

पहिल्या कसोटीत व्हिलन ठरलेला स्टोक्स लगेच दुसऱ्या कसोटी सामन्यात हिरो ठरला. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात तो खऱ्या अर्थाने कसोटीत हिरो ठरला. याचमुळे या सामन्याचा तो हिरो ठरला. सध्या याच खेळाडूचे जगभरात कौतूक होत आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही स्टोक्सचे कौतूक करताना मोठे भाष्य केले आहे. ‘भारतीय संघ जर त्यांच्याकडे स्टोक्स असेल तर जगात अपराजित राहिलं’, असे भाष्य पठाणने केले आहे. पठाणने आपले हे मत ट्विटरच्या माध्यमातून मांडले आहे.

परंतु इरफानचा हा ट्विट भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगला विशेष आवडलेला दिसत नाही. यावर लगेच युवराजने प्रतिक्रीया दिली. “तुला असं म्हणायचं आहे का, भारताकडे सामना जिंकून देणारे अष्टपैलू खेळाडू नाहीत,” असा ट्विट युवराजने केला.

यावर इरफानने प्रतिक्रिया देताना म्हटले, युवराज सिंग आता अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

एकंदरीत इरफानचा नूर पाहता युवराजने सावरुन घेण्याचा प्रयत्न करत म्हटले, मला माहित होतं अशीच प्रतिक्रीया येईल. तरीही तु देखील काही कमी नव्हतास.

यावर इरफानने पुढचा ट्विट करत विषय संपवला. तु मला चांगलच ओळखतोस, असे इरफान यावर म्हणाला.

इरफान पठाणने भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे व २४ टी२० सामने खेळले. त्यात त्याने चांगली अष्टपैलू कामगिरी केली तर युवराजने भारताकडून ४० कसोटी, ३०४ वनडे व ५८ टी२० सामने खेळले. युवराज भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक समजला जातो.

वाचा- स्टोक्स मैदानावर वेळ वाया घालवत आहे, त्यानं कोरोनाची लस शोधली पाहिजे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---