भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी युवराजला भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या बातमीचे खंडन केले आहे. युवराजला वगळण्यात आले नसून त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“युवराजला विश्रांती देण्यात आली आहे. त्याला वगळण्यात आलेले नाही. आम्ही एक धोरण ठरवलं आहे ज्यात ठराविक खेळाडूंना ४-५ महिन्यासाठी संधी देण्यात येईल. ” असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
“इतर खेळाडूंना संधी देऊन (पुढील ४-५ महिने) आम्हाला २०१९चे दावेदार खेळाडू समजतील. युवराज किंवा रैनासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. परंतु आम्ही फिटनेससाठी कठोर धोरण स्वीकारले आहे. ज्यात आम्ही कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. ” असेही प्रसाद पुढे म्हणाले.
प्रसाद यांच्या वक्तव्यामधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी यापुढे फक्त प्रतिभावान खेळाडू असून चालणार नाही तर तो तितकाच फिट खेळाडूसुद्धा हवा.