भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा मॅचविनर म्हटले जाते. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक सामने एकहाती भारताला जिंकून दिले. टी२० व वनडे क्रिकेटमध्ये तो नेहमीच अप्रतिम कामगिरी करत आला. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आपली छाप पाडता आली नाही. आता निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
युवराजचे कसोटी कारकिर्दीबद्दल मोठे विधान
‘विस्डेन इंडिया’ ने युवराजच्या छायाचित्रासह चाहत्यांना प्रश्न केला की, कोणता माजी क्रिकेटपटू भारतासाठी अधिक कसोटी खेळायला हवा होता? यावर युवराज ने रिप्लाय देताना लिहिले, ‘शक्यतो आता हे पुढच्या आयुष्यात होईल! तिथे मी ७ वर्ष बारावा खेळाडू नसेल.’
भारतीय संघासाठी २००३ मध्ये आपले घरचे मैदान मोहाली येथून कसोटी पदार्पण करणारा युवराज २०१२ मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या ९ वर्षाच्या काळात तो केवळ ४० कसोटी सामने खेळू शकला. युवराजने आपल्या कसोटी कारकिर्दीत १९०० धावा व ९ बळी मिळवले.
अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
वयोगट स्पर्धांमध्ये अफलातून कामगिरी करत युवराजने २००० मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आक्रमक फलंदाज ते दिग्गज अष्टपैलू असा प्रवास त्याने आपल्या कारकीर्दीत केला. युवराजने २००० मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघासह विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, २००७ साली भारताने जिंकलेल्या पहिल्या टी२० विश्वचषक विजयात त्याने मोलाची भूमिका बजावलेली. २०११ क्रिकेट विश्वचषकात तो मालिकावीर ठरलेला.
युवराजने भारतासाठी १७ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ३०४ वनडे व ५८ टी२० सामने खेळले. वनडेमध्ये त्याच्या नावे ८७०१ धावा व १११ बळी आहेत. तर, टी२० मध्ये ११७७ धावा व २८ बळी त्याने मिळवले. टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वप्रथम एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याची कामगिरी त्याने केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“म्हणून माझी कारकीर्द लांबली नाही”, उथप्पाने स्वतः सांगितले कारण
क्रिकेटर नसता तर ‘या’ क्षेत्रात कमावले असते सूर्यकुमारने नाव, स्वतः केला खुलासा
‘हा’ असेल वेस्ट इंडिजचा भविष्यातील कर्णधार, पोलार्डने केला खुलासा