भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या जोरदार 2023च्या वनडे विश्वचषकाची तयारी करत आहे. याचीच पूर्वतयारी म्हणून घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळला. त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (15 जानेवारी) खेळला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली. गिलने तर शतकी खेळी केली, मात्र त्याचे शतक होण्याआधीच युवराज सिंगने क्रिकेट मरत आहे असे ट्वीट केले जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
गिलचे शतक होण्याच्या काही वेळाआधीच भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ट्वीट केले. त्यामध्ये लिहिले, ‘गिलने शतक करावे ही इच्छा आणि दुसऱ्या बाजूने विराट मजबूत स्थितीत आहे, मात्र चिंता अशी की स्टेडियम अर्धे खाली? वनडे क्रिकेट संपत आहे का?’
पुढे गिलने 97 चेंडूत 116 धावा केल्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील दुसरेच शतक ठरले असून संघासाठी आणि त्याच्यासाठी हे खास आहे. त्याने 89 चेंडूतच 100 धावा पूर्ण केल्या.
Well played @ShubmanGill hopefully goes on to make a 💯 @imVkohli batting at the other end looking Solid ! But concern for me half empty stadium ? Is one day cricket dying ? #IndiavsSrilanka
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) January 15, 2023
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटनेही पुढे शतकी खेळी केली. त्याने 85 चेंडूत एकेरी धाव घेत 100 धावा पूर्ण केल्या. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 46वे शतक आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 74वे शतक ठरले. त्याचबरोबर हे त्याचे श्रीलंकेविरुद्धचे 10वे वनडे शतक ठरले आहे. यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे शतक करणारा भारतीय ठरला. हा विक्रम करताना त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला मागे टाकले. त्याने 9 शतके केली.
𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 𝐟𝐨𝐫 𝐕𝐢𝐫𝐚𝐭 𝐊𝐨𝐡𝐥𝐢 🔥🔥
His 46th in ODIs and 74th overall 🫡🫡#INDvSL #TeamIndia pic.twitter.com/ypFI9fdJ2I
— BCCI (@BCCI) January 15, 2023
या सामन्यात रोहित 49 चेंडूत 42 धावा करत बाद झाला. त्याने गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिलने दुसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतर विराटने श्रेयस अय्यर याला सोबत घेत भारताची धावसंख्या 300च्या पार नेली.
(Yuvraj Singh Tweet Concerm ODI format when Shubman Gill Scored Century INDvSL 3rd ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता विराटला रोखणे कठीण! सचिनचा विक्रम मोडण्यासाठी ठोकले अजून एक आंतरराष्ट्रीय शतक
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे