काल भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बनवलेली भारताची जर्सी घालून मैदानात उतरला. याची मोठी चर्चा सोशल माध्यमांवर झाली.
हार्दिक पंड्या बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला युवराज हा जुन्याच जर्सीमध्ये होता. युवराजची ही कृती आयसीसीच्या नियमांना धरून आहे किंवा नाही याबद्दल कोणातीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
यापूर्वी असा प्रसंग कधीही घडला नसल्यामुळे क्रिकेटप्रेमी याची जोरदार चर्चा आहे.
एक नियम सांगतो…
क्रिकेटमधील खेळाडूंच्या कपडे आणि वस्तु यांच्याबद्दल नियम आहे. त्यातील एक नियम असा आहे की खेळाडूंचे कपडे हे सारखे असावेत. कारण सर्व खेळाडूंना समान वागणूक हा एक उद्देश आहे.
विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी भारताच्या या दिग्गज खेळाडूने काल गोलंदाजीही केली. भारताने इंडिज विरुद्धचा हा सामना १०५ धावांनी जिंकला.