आयपीएल 2023 हंगामात आतापर्यंत एकूण 6 शतक आले आहेत. यातील एक शतक पंजाब किंग्जसाठी प्रभसिमरन सिंग याने ठोकले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरनने 65 चेंडूत 103 धावा केल्या. या शतकानंतर पंजाब किंग्जची मालकीन प्रीती झिंटा हिने स्वतः प्रभसिमरनची मुलाखत घेतली. या व्हिडिओवर भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवारज सिंग याने केलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सामना शनिवारी (13 मे) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या पंजाबने यजमान दिल्लीला 31 धावांना पराभूत केले. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 20 षटकांमध्ये 8 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पंजाबच्या विजयात प्रभसिमरन सिंग (Prabhasimran Singh) याच्या शतकाची भूमिका महत्वाची राहिली. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. सामना संपल्यानंतर प्रीती झिंटा (Preity Zinta) प्रभसिमरनचे कौतुक करताना दिसली आणि तिने या युवा खेळाडूची मुलाखत देखील घेतली.
प्रीतीने मुलाखतीत प्रभसिमरनला प्रश्न विचारला की, “ही अप्रतिम खेळी करण्यापूर्वी त्याच्या डोक्यात काय विचार होता?” यापर प्रभसिमरनने उत्तर दिले की, “प्रत्येक सामन्यात जो विचार करतो, तोच विचार करून मैदानात गेलो होतो. विकेट्स जात असल्यामुळे जबाबदारीने खेळण्याचा विचार डोक्यात होताच.” ही मुलाखत प्रीतीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केली असून यासोबत एक खास कॅप्शनही दिले आहे.
https://www.instagram.com/reel/CsSuMp3sSg9/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MTIyMzRjYmRlZg==
मुलाखतीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “यावर्षी आयपीएलमध्ये काही शतके पाहायला मिळाले. ही गोष्ट खास आहे, कारण यामध्ये आमच्या सर्वात कमी वयाच्या खेळाडूनेही एक शतक केले आहे. अडचणीच्या काळात विरोधकांवर प्रभाविपणे खेळण्यासाठी प्रभसिमरनचा अभिमान आहे. 22व्या वर्षी आयपीएल शतक करणे ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे. यासाठी त्याला खूप-खूप शुभेच्छा. भारतीय क्रिकेटचे भविष्य चांगल्या हातांमध्ये आहे.”
मुलाखतीदरम्यान प्रीतीने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर युवराज सिंग (Yuvraj Singh) याने दिले. काय विचार करून खेळपट्टीवर गेला होता? असा प्रश्न प्रीतीने विचारला होता. त्यावर प्रभसिरमनने लिहिले की, “जायचं आणि बॅट घुमवायची, हाच विचार करून मैदानात गेला होता.” युवराजने केलेली ही कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चाहते वेगवेगळ्या पद्धतीने यावर व्यक्त होत आहे. (Yuvraj Singh’s comment on Preity Zinta’s interview with Prabhasimran Singh is getting attention)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजच्या नवीन घरी आख्ख्या आरसीबी टीमने लावली हजेरी, ‘हैदराबादी बिर्याणी’चाही लुटला आनंद; पाहा फोटो
‘जेव्हा क्रिकेट कळायला लागले, तेव्हापासून विराटच माझ्यासाठी…’, शतक झळकावल्यानंतर गिलचे मोठे भाष्य