मुंबई । आज माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. आजपर्यंत सेहवागने अनेक वेगवेगळ्या प्रकारे विनोदी अंगाने अनेक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
परंतु आज त्याची हे खेळाडू परतफेड करत आहे की काय असे वाटते. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून सर्वांनी या खेळाडूची आज फिरकी घेत शुभेच्छा दिल्या आहेत.
सेहवागनेही तेवढ्याच उत्साहाने त्यांचे धन्यवाद मानले आहे. वाढदिवस म्हटल्यावर आपल्या या जुन्या संघासहकाऱ्याला आणि मित्राला शुभेच्छा द्यायला युवराज सिंगही विसरला नाही.
युवराजने एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यात सेहवाग आणि युवराज एका बाजूला हात करत काहीतरी मागत आहेत. त्यावर युवराजने लिहिलं आहे की सेहवाग भाई, नेहराजी केक घेऊन पळाले ! वीरू भाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/921321990698369024
नेहरा आणि सेहवाग हे बालपणीचे मित्र असून अगदी सुरुवातीच्या काळात ते एकत्र क्रिकेट खेळत असत. नेहराला मानणारा मोठा वर्ग आणि विशेषकरून क्रिकेटपटू दिल्ली शहरात पाहायला मिळतात.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नेहरा सेहवागला आपल्या गाडीवरून सरावासाठी नेत असे. परंतु वीरू आळशी असल्यामुळे नेहराला त्याच्या घरी वाट पाहावी लागे. म्हणून या वेळात नेहरा सेहवागचा नाश्ता फस्त करत असे.
याचीच एकप्रकारे आठवण करून देणारा ट्विट युवराजने आज केला आहे.